रक्षाबंधनासाठी गावी जाताना अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

1089

रक्षाबंधनासाठी गावी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने 4 जण ठार झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी नागपूर-संभाजीनगर महामार्गावर तळेगाव दशासर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली.

नागपूरहून चंडिकापुरे कुटुंब अल्टो कारने येत होते. सदर कुटुंब आपल्या चांदूररेल्वे तालुक्यातील धोत्रा या मुळगावी जात होते. अल्टो कार एमएच 49 यु 3409 येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली. अनिल सारंगधर चंडिकापुरे (32) व चार वर्षाचा कबीर जागीच ठार झाले. जखमी झालेल्या प्रज्ञा व अनिलची आई लिलाबाई यांना पूलगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या