सिद्धूंना मंत्रीही वैतागले, राजीनाम्याची केली मागणी

65

सामना ऑनलाईन । अमृतसर

वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आता सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पंजाबमध्ये जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू विरोधात आवाज उठवल्यानंतर आता पंजाबचे मंत्री राजेंद्र सिंह बाजवा, भारत भूषण आशु, श्याम सुंदर अरोडा आणि राना गुरमीत सिंह सोढी यांनी सिद्धूवपर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘जर सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर भरोसा नाही तर त्यांना राजीनामा द्यायला हवा. जर ते त्यांच्या दाव्यांवर इतके ठाम आहेत तर ते त्यांच्या नेतृत्त्वात काम करण्य़ासाठी खुर्चीला चिकटून का बसले आहेत, अशी टीका बाजवा यांनी केली आहे. दरम्यान पंजाबमध्ये काँग्रेसचे नुकसान होण्यास सिद्धूच जबाबदार असल्याची तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने पक्षाच्या नेत्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचे व्हिडीओ काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या