संदीप पवार खून प्रकरणाचा ३० तासात उलगडा, चार जणांना अटक

42

सामना ऑनलाईन, पंढरपूर

पंढरपूर नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आज सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्यासंख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. या हत्ये प्रकरणी ठाणे पोलिसांनी चार संशयित मारेकऱ्यांना अटक केली आहे.

संदीप पवार हत्येप्रकरणी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख  प्रदीप शर्मा यांच्या पथकाने या खुनाचा मुख्य सूत्रधार अक्षय उर्फ बबलू सुरवसे यांच्यासह पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ या चौघांना  २ पिस्तुलासह अटक केली आहे.

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी सोमवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मारेकरी भर बाजारपेठेत घुसून निर्दयपणे हत्या करीत आहेत. पंढरपूर हे अध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे. अशा पवित्र नगरीत भरदिवसा खून पडत आहेत हि बाब चिंताजनक आहे काल पासून पंढरपूर शहर कडकडीत बंद आहे. शहरातील लोक तणावग्रस्त आहेत शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने विशेष उपाय योजना करावी अशी मागणी आमदार भालके यांनी विधानसभेत केली या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी शासनाला निवेदन करण्याचे निर्देश केले.

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यात पंढरपूरकर मग्न असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हॉटेल श्रीराम मध्ये नगरसेवक संदीप पवार यांच्या प्राणघातक हल्ला झाला. या घटनेची बातमी पसरताच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली हो.

संपूर्ण शहर कडकडीत बंद असल्याने भाविकांचे हाल झाले आज दुपारी पर्यन्त बाजारपेठ बंद होती. भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद तर दूरच राहीला, पिण्यासाठी पाणी देखील सहज उपलब्ध झाले नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात अधिकचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हॉटेल श्रीरामच्या डाव्या कोपऱ्यातील टेबलवर संदीप बसला आहे अशी टीप मारेकऱ्यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे मारेकरी हॉटेल मध्ये शिरले. पण डावा आणि उजवा यात गोंधळ झाल्याने मारेकऱ्याने उजव्या टेबलावरील चुकीच्या व्यक्तीवर पिस्तूल रोखले. मात्र गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या सहकाऱ्याने हा नाही हा इकडे बसला आहे. असा इशारा करत सावध केले. हे घडले नसते तर संदीप समजून भलत्याच व्यक्तीचा जीव गेला

दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी संदीपला तुझ्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो तू सावध रहा असे सांगितले होते पोलिसांना हल्ला होणार याची कुणकुण होती तर हल्लेखोरांना वेळीच अटक का केली नाही या घटनेत पोलिसांनी निष्काळजीपण केला.

आतातरी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. या हत्येच्या मागे असलेल्या मास्टरमाइंडला अटक करावी आणि पवार कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे अध्यक्ष आणि नवी मुंबई शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली

आपली प्रतिक्रिया द्या