झारखंडमध्ये काळी जादू केल्याच्या संशयातून 4 जणांची मारहाण करून हत्या

86

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडच्या गुमला जिह्यात काळी जादू केल्याच्या संशयातून 4 जणांना बेदम मारहाण करून त्यांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुमला जिह्यातील सिसकारी गाकात शनिकारी घटना घडली. 10 ते 12 लोकांनी चार लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण करीत  नंतर गळा चिरून त्यांची हत्या केली.

गुमला जिह्याचे पोलीस अधीक्षक अंजनी कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांची हत्या करण्यात आली आहे ते जादूटोणा करत होते असा संशय आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या चौघांची हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे झा म्हणाले.

त्या चौघा संशयितांची हत्या करण्यापूर्वी ग्रामस्थांनी एक बैठक बोलाकली होती. या बैठकीत चारजणांवर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.  मृतांमध्ये सुना ओराओन (65), फगनी ओराईन (60), चंपा ओराईन (79 ) आणि पीरो ओराईन देकी (79) आहेत. मृतांमध्ये देन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच झारखंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण आणि हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. गाकातील अनेक घरांना कुलपे लावून गावकरी गावाबाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे पोलीस सरपंचाकडे या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काठय़ा आणि धारदार शस्त्रे घेऊन काही लोक आले होते. त्यांनी तीन घरांचे दरकाजे उघडायला लाकले. त्या घरातील चारजणांना आपल्या ताब्यात घेऊन तीनही घरांना कुलुपे लावली. नंतर चारहीजणांना त्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांची गळा चिरून हत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या