गेवराई तालुक्यात पाणी टंचाईने घेतला चार वर्षांच्या मुलीचा बळी

24
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । गेवराई

मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. गेवराई तालुक्यातील अंबुनाईक तांडा येथील शेतकरी बैलगाडीतून पाणी आणण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व दोन मुल होती. यातील एक चार वर्षांची मुलगी अचानक खाली पडल्याने तिच्या अंगावरून गाडीचे चाक गेले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजता घडली. खांडवी येथील अंबुनाईक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. आज सकाळी पापासाहेब आडे बैलगाडीने पाणी आणण्यासाठी जात होते. त्य़ावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेने अंबुनाईक तांडा येथे हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या