पालम शहरातील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी चौदाजणांना अटक

35

सामना प्रतिनिधी । परभणी

पालम शहरात दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर हा वाद विकोपाला जावून दगडफेक व जाळपोळीची घटना घडली. यामध्ये १० लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून १४ जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी नामदेव उमाजी राठोड यांनी सरकारच्या वतीने तक्रार दाखल केली. या तक्रारीत या चौदा जणांनी बेकादेशीर जमाव व गैर कायद्याची मंडळी एकत्र जमवून दगडफेक करून खाजगी लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले. तसेच नांदेड पालम या रस्त्यावरील वाहतूक बंद करून अडथळा निर्माण केला. पालम परिसरातील हॉटेल, पानटपरी, हातगाडे दुचाकी व चारचाकी वाहन यांची तोडफोड करून जाळून टाकली. यात १० लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हिंगोली येथून पोलीस बल तैनात करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात शेख गौस, दिलीप घोरपडे, सचिन शिंदे, मनोहर घोरपडे, बालासाहेब घोरपडे, मनोहर घोरपडे, गजानन कदम, महेश लांडे, शिवलिंग स्वामी, श्रीहरी लोखंडे, श्याम जाधव, जावेद खान, मजहर खॉ, मुंजा जाधव, विश्वास घोरपडे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय पोलीस श्रीधर कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण मोरे, प्रकाश कापुरे, सुनील गोपीनवार, मधुकर पवार, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, सुरेश डोंगरे, हनुमंत जक्केवाड, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, जमीर फारोखी, सय्यद मोबीन, गणेश कौटकर, सय्यद मोबीन यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नागरिकांनी आफवांवर विश्वास न ठेवता या घटनेबाबत आरोपीबद्दल काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या