फ्रान्स राष्ट्रपतींच्या ताफ्यात हिंदुस्थानी बनावटीची स्कूटर

815

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात हिंदुस्थानी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर सामिल झाली आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीने प्युजो मोटरसायकल (पीएमटीसी) टेकओव्हर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या कंपनीची निर्मिती असलेली इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रान्समध्ये निर्यात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यात दाखल झालेली मेड इन इंडियाचा लेबल लागलेली ही पहिलीच स्कूटर आहे.

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे संचालक आनंद महिंद्रा यांनी स्वतः ही माहीती दिली. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर सांगितले,‘प्युजो मोटारसायकल्स (@medahindraRiedes) फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्यांच्या ताफ्यातील ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे. प्यूजो ई-लुडिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती मध्य प्रदेशातील महिंद्रा के पीथमपूर प्लांटमध्ये करण्यात येत आहे. या स्कूटरमध्ये ‘3वे’चे इलेक्ट्रिक मोटर बसविण्यात आली आहे. या स्कूटरचे एकूण वजन 85 किलोग्रॅम इतके आहे.

चार्जिंग, वेग आणि रेंज
ई-लुडिक्समध्ये लिथिमय-आयर्न बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी रिमूव्हेबल असून स्कूटरमधून काढून ती चार्ज करता येऊ शकते. स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो. एकवेळेस पूर्ण चार्जिंग असेल तर ती 50 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. या स्कूटरची टॉप स्पीड 45 किलोमीटर प्रतितास एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या