पोस्टाद्वारे येणाऱ्या शेकडो अंतर्वस्त्रांमुळे पंतप्रधान कार्यालय वैतागले

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्समध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. तिथल्या जनतेला घराबाहेर पडण्यास आणि गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एकीकडे फ्रान्समध्ये ही परिस्थितीत असताना दुसरीकडे तिथले पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांच्या कार्यालयात पोस्टाद्वारे शेकडो अंतर्वस्त्रे यायला लागली आहे, यामुळे पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत.

चड्डी छोटी शिवली म्हणून पोलिसांत तक्रार, कोर्टात जाण्याचा पोलिसांचा सल्ला

ही पार्सलं लाँजरी (अंतर्वस्त्राचे दुकान) दुकानाचे मालक पाठवत असल्याचं कळालं आहे. लॉकडाऊनमुळे फ्रान्समधील अंतर्वस्त्रांची दुकाने बंद आहेत. दुकान बंद असल्यामुळे मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याची पंतप्रधानांना कल्पना यावी यासाठी अंतर्वस्त्रांची ही पार्सलं पाठवली जात असल्याचं कळालं आहे.

लॉकडाऊनपासून पतीचा आंघोळीला रामराम, रोज करतो सेक्सची मागणी; पत्नीची पोलिसात तक्रार

या पार्सलांसोबत अंतर्वस्त्रांची दुकाने पुन्हा उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणारी पत्रेही आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरीस ही जगभरातील फॅशनचे केंद्र मानले जाते. जगभरातील नामांकीत फॅशन ब्रँड पॅरीसमधून त्यांचा सगळा व्यवहार करत असतात. लॉकडाऊनमुळे या सगळ्या कंपन्या, दुकानं तसेच ब्रँडवर विपरीत परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे

करता करता दमला, सेक्स करताना अवसान गळाल्याने तरुणाचा मृत्यू

ब्रँडेड कपडे हे अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत नसल्याने ही दुकाने उघडण्यास तिथे परवानगी नाहीये. यामुळे क्युलेटी नावाच्या एका गटाने संपूर्ण फ्रान्समध्ये निदर्शनेही केली होती. यामध्ये 200 दुकानदारांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या दुकानदारांना आवाहन करण्यात आलं होतं, की निषेध दर्शवण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना पोस्टाने अंतर्वस्त्रे पाठवावीत. या दुकानदारांच्या मागणीला स्थानिकांनीही पाठिंबा दिला आहे. आमच्यासारखे दुकानदार हे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करत असतात यामुळे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या