फ्रान्सला पुसून टाकायचाय २०१६ चा कलंक

56

सामना ऑनलाईन | सेंट पिटर्सबर्ग

फ्रान्सने मंगळवारी बेल्जियमला १-० असे पराभूत करीत २१व्या फिफा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल गाठणाऱ्या फ्रान्स संघाला आता सलतेय ती २०१६च्या युरो कप फायनलमधील पराभवाची खंत. पोर्तुगालने फ्रान्सला पराभूत करीत युरो चषक पटकावला होता. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देसचाम्प यांनीही दोन वर्षांपूर्वीचा पराभवाचा कलंक यंदा पुन्हा विश्वचषक पटकावून पुसण्याचा निर्धार केला आहे. आता जगजेतेपदच आपल्या संघाला त्या पराभवाच्या भळभळत्या जखमेच्या वेदनांतून बाहेर काढेल असे देसचाम्प म्हणाले.

मंगळवारी रात्री बेल्जियमवरील विजयानंतर फ्रेंच फुटबॉलपटूंनी आनंद व्यक्त केला .पण खरा जल्लोष मात्र दुसऱ्या विश्वविजेतेपदानंतरच साजरा करू, अशी प्रतिक्रिया फ्रान्सचा कर्णधार हयूगो लॉरीस याने व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालने मायदेशी लादलेला पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे असेही लॉरीस म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या