मैत्रीण-राजेश शृंगारपुरे

25

जवळची मैत्रीण – डिंपल

तिचा पॉझिटिव्ह पॉइंट – स्वभाव

तिचा निगेटिव्ह पॉइंट – गजरा घालत नाही

तिच्यातली आवडणारी गोष्ट – स्पष्टवक्तेपणा. जे आहे ते तोंडावर बोलते.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट – कायम माझ्याबरोबर आहे याहून बेस्ट गिफ्ट काय असणार!

तिच्याकडून काय शिकलात? – कर्म चांगली करत राहा. सगळ्यांशी चांगलं वागा हे शिकलो.

एकमेकांसाठी वेळ देता का ? – हो. द्यावाच लागतो. शूटिंगमध्ये असलो की वेळ देता येत नाही. मग घरी आलो की भरपूर बोलतो.

तिची आवडती डीश – भेळपुरी, पाणीपुरी. तिला चटपटीत असेल ते सगळं आवडतं.

ती डिस्टर्ब असते तेव्हा – स्वत:पुरती असते. कुणाला दाखवत नाही. पण मला कळतं ते…

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण – तिची सोबत. बरेच क्षण… किती सांगणार! माझा नवा पिक्चर बघताना ती असते तो प्रत्येक क्षण… खरं तर तीच माझी पहिली समीक्षक आहे.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते? – नॉर्मली त्यावेळी बोलत नाही. माझा राग शांत होण्याची वाट पाहाते. माझं बोलून झालं की शांतपणे मला माझी चूक समजावून सांगते. ते तिला बरं जमतं.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण – घरच…

भांडण झाल्यावर काय करता? – मुळात ती शांत असते. मग मलाच उगीच बोललो याचं वाईट वाटतं. कधी अबोला धरते, पण त्यातही गंमत असते.

दोघांपैकी जास्त राग  कोणाला येतो? – मलाच

तिचे वर्णन – मला जशी हवी होती तशी मिळाली. साधी, सरळ, स्पष्ट बोलणारी… संसाराचा गाडा हाकणारी. मला अभिमान वाटतो तिचा याबाबतीत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या