फ्रान्सचा पाकिस्तानला दणका, मीराजच्या सुधारणेला नकार

फ्रान्स सरकारच्या धर्मांधता धोरणाला विरोध करणाऱया आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱया पाकिस्तानला फ्रान्सने एक जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगोस्टा 90 बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये अपग्रेडेशनची म्हणजे सुधारणा करण्याची विनंती केली होती. पण फ्रान्सने पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली आहे. मध्यतंरी इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध करण्यात आला. यामध्ये इम्रान खान सुद्धा होते. त्यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती.फ्रान्सने पाकिस्तानच्या संरक्षण सामुग्रीच्या अपग्रेडेशनला दिलेला नकार ही त्याचीच परिणीती आहे. पाकिस्तान-फ्रान्समध्ये संबंध बिघडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या