लष्कराच्या नावाने लावला जातोय चुना, बँक खात्यावर डल्ला

लष्कराच्या नावाने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहे. नागिरकांची फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र सायबरने ट्विटरवर जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. सायबर गुन्हेगार हे फसवणुकीसाठी दिवसेंदिवस नवनवीन आयडिया शोधून काढतात. पूर्वी केंद्रीय औद्योगिक बलातील जवानांच्या (सीआयएसएफ) नावाने फसवणूक केली जात होती. आता लष्कराच्या नावाखाली नागिरकांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला मिळाली आहे.

जखमी झालेल्या सैनिकाच्या नावाने ट्रस्ट सुरु केली आहे असे भासवले जाते. विश्वास बसावा म्हणून लष्करी जवानांचे ओळख पत्र ऑनलाईन पाठवले जाते. त्यानंतर त्या ट्रस्टच्या नावाखाली पैसे भरण्यास भाग पाडले जाते. ऑनलाईन खरेदी विक्रीच्या नावाखाली क्युआरकोड, ओटीपी घेऊन नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. नागिरकांना लष्कराबाबत असलेले प्रेम पाहता लष्कराने तयार केलेल्या वस्तू विकत घेण्यास भाग पाडून फसवणूक करतात. त्याच प्रमाणे जवानांना घरच्यांना पैशाची खूपच गरज आहे. बँक खात्यात पैसे जमा करावे असे भासवले जात आहे.

नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी जनजागृती अभियान हाती घेतले आहे. जखमी झालेल्या सैनिकाच्या नावाखाली ट्रस्ट सुरु करणे, वस्तू खरेदीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे.
– यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर

आपली प्रतिक्रिया द्या