सत्तेत आल्यास सगळ्या बिहारवासीयांना कोरोनाची लस मोफत देणार, भाजपचे जाहीरनाम्यात आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये भाजपने म्हटलंय की जर ते सत्तेत आले तर कोरोनाची लस जेव्हा केव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती सगळ्या बिहारवासीयांना मोफत टोचण्यात येईल. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरमान्यात म्हटलंय की “कोरोनाविरूद्धच्या लढाईत बिहारमध्ये एनडीए सरकारने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आमचा संकल्प आहे की कोरोनाची लस जेव्हा आयसीएमआरच्या मान्यतेनंतर उपलब्ध होईल तेव्हा प्रत्येक बिहारवासीयाला ती नि:शुल्क देण्यात येईल “

यावर ट्विटरवरून लोकांनी भाजपला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. शाहीद आलम नावाच्या तरुणाने एक ट्विट केलं आहे ज्यात त्याने म्हटंलं आहे की “अजून लस आली देखील नाहीये, मात्र ती निवडणुकीचा जुमला बनली आहे. सगळ्या राज्यांसाठी केंद्र सरकारची समान जबबाबदारी नसते का ?”

अनिल झा नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्याने म्हटलंय की “फक्त बिहारच नाही तर संपूर्ण देशासाठी तुम्हाला लस मोफत द्यावी लागेल. केंद्रात दलाली करण्याबाबत तुम्हाला बोलण्यास सांगितलं नाहीये “

आशू नावाच्या एका ट्विटरवापरकर्त्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ” याचा अर्थ असा की उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका नाहीयेत तिथे तुम्ही मोफत लस देणार नाही ?”

रवी सिसोदिया नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने या आश्वासनावर प्रश्न विचारला आहे की “अजूनही जुमल्यांनी जनता मूर्ख बनेल ?”

आपली प्रतिक्रिया द्या