Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘1 एप्रिल’चे राशीभविष्य

मेष (ARIES – saturday, April 1, 2023)
आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. सकाळी हिरव्या गवतावरून चाला. महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधावा लागेल. कार्यालयीन कामाला महत्त्व द्यावे लागेल. सहकारी मदत करतील. प्रिय व्यक्तिची भेट होईल. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : आकाशी

वृषभ (TAURUS – saturday, April 1, 2023)
शिवमंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घ्या. घरकामात वेळ निघून जाईल. गुंतवणूक कराल. सायंकाळी मनोरंजनाचा आनंद घ्याल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आज जोडीदारासोबत वेळ घालवाल. सहकाऱ्यांना समजून घ्या. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : गुलाबी

मिथुन (GEMINI – saturday, April 1, 2023)
आर्थिक स्थिती सुधारेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. दुसऱ्यांचा विचार कराल. देवाला पिवळ्या रंगाची फुले वाहा. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालत बसू नका. इतरांचा विचार करायला शिका. मनाजोगी खरेदी कराल. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER – saturday, April 1, 2023)
गणपती मंदिरात दर्शनाला जा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ध्यानधारणा आणि योगसाधनेसाठी वेळ द्याल. आर्थिक लाभ होती. मिळालेली संधी वाया घालवू नका. बालपणातील आठवणीत रमाल. पुस्तके वाचा, सिनेमा पाहा. रिकामा वेळ तुम्हाला हवा त्या पद्धतीने घालवाल.
शुभरंग : केशरी

सिंह (LEO – Friday, saturday, April 1, 2023)
अनावश्यक कोणालाही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला देऊ नका. झेंडुच्या फुलांचे तोरण दाराला लावा. स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करा. स्वप्ने साकार करण्यासाठी मेहनत कराल. शेजारी तुमचे कौतुक करतील. समुद्रात पैसे अर्पण कराल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – saturday, April 1, 2023)
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. डोळ्यांची काळजी घ्या. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. केसांत अबोलीचा गजरा घाला. कामावर लक्ष केंद्रित करा. सकाळी सूर्योपासना करा. पारिजातकाच्या झाडाला पाणी घाला. आवडत्या व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : हिरवा

तूळ (LIBRA- saturday, April 1, 2023)
घरातील सामान जागच्या जागी लावा. सशक्त मन हे सशक्त शरीरामध्ये वास करते. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. सहकाऱ्यांना समजून घ्याल. कामावर वरिष्ठ खूश होतील. दुसऱ्यांचा विचार करा. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल. अत्तराचा वापर करा.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – saturday, April 1, 2023)
आरोग्य चांगले राहिल. स्वत:साठी वेळ काढाल. विवाहाचा परमानंद घ्याल. प्रिय व्यक्तिला समजून घ्याल. मित्रमैत्रिणींशी अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. घरात आनंदाची बातमी कळेल. देवीला शेवंतीचे पिवळे फूल किंवा वेणी वाहा. दररोज व्यायामासाठी किमान पंधरा मिनिटे तरी काढा.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – saturday, April 1, 2023)
सकारात्मक राहा. किमती वस्तूंची काळजी घ्या. पत्नीसोबत सहलीला जाल. स्वत:साठी वेळ काढाल.जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मिळकत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. तुमच्या बोलण्यामुळे कोणाचा मूड खराब होणार नाही, याची काळजी घ्या. सहलीला जाऊन दिवस आनंदात घालवा.
शुभरंग : किरमिजी

मकर ( CAPRICORN – saturday, April 1, 2023)
चांदीच्या तांब्यातील पाणी प्या. अतिखाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी जिमला जा. पैशाचा संचय करण्यासाठी गुंतवणुकीचे कौशल्य वापरा. मित्रांसोबत मनसोक्त फिरायला जाल. निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या. सकाळी भूमीला वंदन करूनच दिवसाची सुरुवात करा.
शुभरंग : मोती

कुंभ (AQUARIUS – saturday, April 1, 2023)
तांब्याचा शिक्का खिशात ठेवा. सौंदर्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी घरातील वाद सांगत बसू नका. नातेवाईक अनपेक्षित घरी येण्याची शक्यता आहे. भगवंताच्या नामाचा आनंद घ्या. मौल्यवान क्षण जपा. वेळेची किंमत समजा. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका.
शुभरंग : पिवळा

मीन (PISCES – saturday, April 1, 2023)
घरात कापराचा धूप करा. मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या बिलांबाबत सजग राहा. प्रियजन तुमची काळजी घेतील. बुद्धिबळाचा खेळ शिकून घ्या. दिवस उत्तम जाईल. धार्मिक कार्यासाठी दान करा. कामाच्या वेळेत सिनेमा पाहू नका.
शुभरंग : चंदेरी