Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’13 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Monday, February 13, 2023)
एखाद्या व्यक्तिशी बोलण्याचा प्रयत्न करत असाल, तर आज ते शक्य होईल. आहारात मिठाचा समावेश जास्त प्रमाणात करू नका. घरातील वातावरण आनंददायी असेल. कार्यालयात वरिष्ठ कौतुक करतील. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : पोपटी

वृषभ (TAURUS – Monday, February 13, 2023)
दिवसाची सुरुवात चांगली होईल. पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. करियरवर लक्ष केंद्रित करा. अनपेक्षितपणे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहणारी कामे कराल. कलेत मन रमवाल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. गुरुंची सेवा करा.
शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Friday, February 10, 2023)
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाल. प्रकृतीची काळजी घ्या. झटपट पैसे कमावण्याची ईच्छा होईल. गोड बातमी मिळाल्याने कटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या जुन्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. रिकामा वेळ मित्रांसोबत घालवाल.
शुभरंग : गुलाबी

कर्क (CANCER – Friday, February 10, 2023)
व्यसन करणे टाळा. घरातील वरिष्ठ व्यक्तिसोबत वेळ घालवाल. आनंदाची बातमी कानी येईल. सायंकाळी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवाल. अनावश्यक बोलू नका. जुन्या गुंतवणुकीमुळे फायदा होईल. यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. प्रिय व्यक्तिकडून आवडती भेटवस्तू मिळेल.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Friday, February 10, 2023)
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. मुलं आवडीनुसार वागणार नाहीत. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखद असेल. आज आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. नातेवाईकांसोबत भांडण करू नका. प्रलंबित देणी वेळीच पूर्ण कराल.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Friday, February 10, 2023)
चांदीची अंगठी बोटात घाला. दीर्घ मुदतीची गुंतवणूक कराल. वरिष्ठ सहकार्य करतील. इतरांचे वागणे पाहून त्यातून धडा शिकाल. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. प्रिय व्यक्तिसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. वेळेचा सदुपयोग कराल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्याल.
शुभरंग : निळा

तूळ (TULA- Friday, February 10, 2023)
भावंडांच्या मदतीने धन लाभ होईल. गुलाबाचे अत्तर घरात शिंपडाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सतत हसतमुख राहाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. हितचिंतकाकडून महत्त्वाची माहिती मिळेल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, February 10, 2023)
जुनी आणि फाटलेल्या पुस्तके वेळीच बायडींग करून घ्या. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी सुकर होतील. घरातील लहान मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. आजचा दिवस कामात जाईल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. जोडीदार आज तुमच्यासाठी खास वेळ काढेल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : केशरी

धनु (SAGITTARIUS – Friday, February 10, 2023)
घरातील ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. कलात्मक छंद जोपासाल कामाचे वेळापत्रक धकाधकीचे असेल. घरी शुभकार्य सोहळा साजरा होण्याची शक्यता आहे. आजची सायंकाळ सुखद आणि अनोखी असेल. घरी नातेवाईक येण्याची शक्यता आहे. लहान मुलांसोबत बागेत फिरायला जाल.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Friday, February 10, 2023)
नवख्या माणसांमुळे चेहऱ्यावर स्मित झळकेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमधून घरी परतताना आवडते काम करू शकाल. आजची सायंकाळी जोडीदारासोबत व्यतित कराल. प्रिय व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : खाकी

कुंभ (AQUARIUS – Friday, February 10, 2023)
गरिबाला लाल रंगाच्या कापडाचे दान करा. वजन घटवण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबियांसाठी वेळ द्याल. गुंतवणुकीकरिता योग्य ठिकाणी मार्गदर्शन घ्या. मानसिक शांततेचा अनुभव होईल. जुन्या कामांची उजळणी कराल. स्वप्न साकार होईल.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Friday, February 10, 2023)
वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा. स्वत:साठी आज पुरेसा वेळ मिळेल. प्रकृती चांगली राखण्यासाठी चालण्याचा व्यायाम कराल. मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे खर्च होतील. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. स्वयंसेवी संस्थांची तुमच्या कामाकरिता मदत घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
शुभरंग : काळा