Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘8 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, February 8, 2023)
आजचा दिवस आनंदात घालवाल. व्यवसायात नफा होईल. गेल्या 2 महिन्यात आलेल्या अडचणींपासून आज सुटका होईल. महिलावर्गाने अग्निजवळ काम करताना सावध असावे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने करावीत. चाफ्याच्या फुलांचा सुगंध घ्या.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Wednesday, February 8, 2023)
सावधपणे व्यवहार करा. रागाने बोलून इतरांची मने दुखवू नका. स्त्रियांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करता यावा, यासाठी सरस्वती देवीची उपासना करावी. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. दत्त महाराजांचे दर्शन घ्या.
शुभरंग : पिवळा

मिथुन (GEMINI – Wednesday, February 8, 2023)
आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. काम करणाऱ्या लोकांकडून अनपेक्षितपणे चूक होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाल. परिस्थितीचा स्वीकार करायला शिका. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : खाकी

कर्क (CANCER – Wednesday, February 8, 2023)
घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. नवीन नाती जोडाल. कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. पैशाचे व्यवहार सावधगिरीने करा. तरुणांसाठी आजचा दिवस उत्साहपूर्ण आहे. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Wednesday, February 8, 2023)
कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत आनंदात दिवस घालावल. आरोग्य चांगले राहिल. व्यावसायिकांनी नफा कमवण्याच्या दृष्टीने चांगल्या संकल्पना अंमलात आणाव्यात. ‘कर भला तो हो भला’, असा अनुभव येईल. परदेशी नोकरीचा योग आहे. विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष वाचावे. गणपतीचे दर्शन घ्यावे. गुंतवणुकीचे पर्याय शोधाल.
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Wednesday, February 8, 2023)
कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. मनासारख्या गोष्टी घडून येतील. दररोज योगसाधना करा. सहलीला जाण्याचा योग आहे. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवाल. सौंदर्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहिल. तुळशीला चमचाभर दूध आणि पाणी घाला.
शुभरंग : लाल

तूळ (TULA- Wednesday, February 8, 2023)
कामात व्यस्त राहाल. पचनविकारापासून सावध राहावे लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंसोबत धार्मिक कार्यानिमित्त प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ कौतुक करतील. मेहनत करणाऱ्याला यश मिळतेच, हे लक्षात ठेवा. मन:शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : आकाशी

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, February 8, 2023)
एखादा माहित नसलेला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. भविष्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका. कलाकारांसोबत नव्या माहितीची देवाणघेवाण होईल. व्यावसायिकांना व्यवहारात नफा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. पुरुषांना कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे लक्ष द्यायला कमीत कमी वेळ मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : हिरवा

धनु (SAGITTARIUS – Wednesday, February 8, 2023)
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आहारात पालेभाज्यांचा समावेश कराल. घरातील लहान मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील महिलांना नटून थटून एखाद्या समारंभात सहभागी होण्याची संध मिळेल. घरात अनपेक्षितपणे पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरात गुरुचरित्राचे वाचन करा.
शुभरंग : लाल

मकर ( CAPRICORN – Wednesday, February 8, 2023)
जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट होत नाही, तेव्हा सर्व काही ईश्वराच्या इच्छेने घडत असते, हे लक्षात ठेवा. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यर्थ चिंता करू नका. कुलदेवतेचे दर्शन घ्या. नामस्मरण करा. मन प्रसन्न राहिल अशा कृती करणाऱ्याला प्राधान्य द्यावे लागेल. घरातील फुलदाणीत पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले ठेवा.
शुभरंग : चंदेरी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, February 8, 2023)
प्रत्येक काम मन लावून करा. अंधाराची भीती बाळगू नका. आज केलेली बचत भविष्यात कामी येऊ शकते. तरुणांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. आरोग्याकडे लक्ष द्यावे. दारात दररोज सकाळी रांगोळी काढा. आपल्या आवडत्या देवतेला मनोभावे नमस्कार कराल. आवडता पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : निळा

मीन (PISCES – Wednesday, February 8, 2023)
नव्या नव्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या वेळेच सदुपयोग करून घ्या. अडचणींशी लढण्यासाठी बळ मिळेल. शेती करणाऱ्यांनी सरकारी योजनांकडे लक्ष ठेवायला हवे. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभरंग : आकाशी