Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘9 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, February 9, 2023)
तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. मनात कामाच्या ताणाचे विचार असू शकतात. पूर्वसूचना न देता नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे मित्रमंडळींना वेळ देता येणार नाही.
शुभरंग : लाल

वृषभ (TAURUS – Thursday, February 9, 2023)

पांढऱ्या सशाला हिरवा चारा खाऊ घाला. आवडते स्वप्न साकार होईल. तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवा. धन लाभाची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण गुलाबी होईल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे.
शुभरंग : केशरी

मिथुन (GEMINI – Thursday, February 9, 2023)
लाल मसुराची डाळ गरिबाला दान द्या. पैशाची बचत करायला शिकाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवायला शिका. सतत हसतमुख राहण्याच्या आपल्या स्वभावामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. लहानसा व्यवसाय जोडधंदा म्हणून करायचा विचार करा.
शुभरंग : पांढरा

कर्क (CANCER – Thursday, February 9, 2023)
सात बदाम आणि सात काळे चणे शनी मंदिरात चढवा. चिडचिड होणार नाही, याची काळजी घ्या. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. ब्यूटि पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : काळा

सिंह (LEO – Thursday, February 9, 2023)
गोशाळेत धन अर्पण करा. मनातील निराशा काढून टाका. कुटुंबातील सदस्याकडून आपल्या कामाला पाठिंबा मिळेल. तुमच्या उत्तम संकल्पना कृतीत आणा. मनाजोगी खरेदी कराल. दारी आलेल्या पाहुण्याचा यथायोग्य पाहुणचार करा.
शुभरंग : गुलाबी

कन्या (VIRGO – Thursday, February 9, 2023)
सूर्याला अर्घ्य द्या. स्वत:विषयी छान वाटावे, अशा अद्भूत गोष्टी घडण्याचा आजचा दिवस आहे. भावंडांकडून उधार मागू नका. गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करू नका. अनुभवी लोकांसाठी वेळ काढाल. मनावर नियंत्रण ठेवा.
शुभरंग : लाल

तूळ (TULA- Thursday, February 9, 2023)
कुष्ठरोग्यांना मदत करा. सगळे ताणतणावर दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे. नवीन गोष्ट शिकण्याकडे कल राहिल. विनाकारण चिंता करणे सोडून द्या. रिकामा वेळ सत्कारणी लावा.
शुभरंग : निळा

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, February 9, 2023)
छोट्या-मोठ्या गोष्टिंचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. घरातील कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या अति बोलण्यामुळे जोडीदार वैतागू शकतो. मिळालेला वेळ आवडते छंद जोपासण्यात घालवा. टीव्ही, मोबाईलचा अतिवापर टाळा. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पोपटी

धनु (SAGITTARIUS – Thursday, February 9, 2023)
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. चकित करणारी एखादी छान भेटवस्तू मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. प्रेमगीतं ऐकाल. आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकाल. भावंडांकडून मदत मिळेल.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Thursday, February 9, 2023)
गाईला गूळ खाऊ घाला. आजचा दिवस करमणुकीचा असेल. इतरांवर प्रभाव पाडाल. स्वत:करिता वेळ द्याल. पुस्तक वाचनाचा छंद जोपासाल. लोकं तुमचे कौतुक करतील. मोगऱ्याचा गजरा श्रीदुर्गादेवीला अर्पण करा. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Thursday, February 9, 2023)
आहारात हिरव्या चण्यांचा समावेश करा. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. अपूर्ण राहिलेली कामे वेळ काढून पूर्ण करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. घरातील सगळ्यांसाठी आजचा क्षण आनंदाचा असेल. सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने करा.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Thursday, February 9, 2023)
कुटुंबात आनंदाची वाढ होईल. तुमच्या जबरदस्त इच्छाशक्तीचे तुम्हाला फळ मिळेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रुपांतर होईल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. मित्रमैत्रिणींसोबत छान वेळ घालवाल.
शुभरंग : चॉकलेटी