Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘ 1 जून’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, June 1, 2023)
अचानकपणे आहारात बदल करू नका. सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल. नातेवाईकांच्या वागण्या-बोलण्याकडे दुर्लक्ष करा. कोणतेही अंदाज न बांधता अभ्यास करा.
शुभरंग : मोती

वृषभ (TAURUS – Thursday, June 1, 2023)
वेळ वाया घालवू नका. नव्या उपक्रमांना चालना मिळेल. कुमारिकांना खीर वाटा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. इतरांच्या मतांचा आदर कराल. आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या सुप्सचा समावेश करा. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू नका.
शुभरंग : नारिंगी

मिथुन (GEMINI – Thursday, June 1, 2023)
हळदीचे दूध प्या. जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा. प्रवासात पाकीट सांभाळा. खर्च जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. कृष्णाला तुळस वाहा. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. मनाला आवडणारी कामे करा. प्रवासाला जाण्याचे योग आहेत.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Thursday, June 1, 2023)
मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. सुगंधी फुले सुवासिनींना भेट द्या. धनलाभाची शक्यता आहे. जोखमीची कामे काळजीपूर्वक करावी लागतील. कुटुंबात एकोपा जपाल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. घरात सुवासिक अत्तर शिंपडा.
शुभरंग : तांबडा

सिंह (LEO -Thursday, June 1, 2023)
इतरांसोबत आनंद वाटून घ्याल. एखाद्या समारंभात सहभागी व्हावे लागण्याची शक्यता आहे. घरातील मंडळींना वेळ द्या. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रा कराविशी वाटेल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपा.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Thursday, June 1, 2023)
घरातील आजी, आई अशा मोठ्या स्त्रीचा आशीर्वाद घ्या. वरिष्ठांचे दडपण येईल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. कोणाचीही अनावश्यक थट्टा करू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. लोकं तुमचे अभिनंदन करतील. जोडीदाराकडून कौतुकाची थाप मिळेल.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (TULA- Thursday, June 1, 2023)
आहारात मधाचा समावेश करा. निवांत राहाल. इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. गरजवंतांना मदत कराल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. गोड पदार्थ खावासा वाटण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी सूर्यनमस्कार घाला. सकारात्मक विचार कराल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, June 1, 2023)
आहारात काळे चणे, काबुली चण्यांचा समावेश करा. मोहरीचे तेल दान करा. कोणताही निर्णय घेण्याआधी त्यावर विचार करा. जोडीदाराला दिलेले वचन पाळावे लागेल. घरातील नको असलेल्या वस्तू वेळीच घराबाहेर काढा. संयम पाळा. मोह आणि लोभ टाळा. चिडचिड करू नका.
शुभरंग : खाकी

धनु (SAGITTARIUS – Thursday, June 1, 2023)
गर्दीत जाणे टाळा. अडीअडचणीत नशिबाची साथ मिळेल. व्यवहारात पारदर्शकता ठेवाल. देवीला अबोलीच्या फुलांची वेणी घाला. जुनी येणी वसूल होतील. प्रयत्न अर्धवट सोडू नका. नोकरीतील अडचणी कमी होतील. कार्यालयात मनमानीपणा करू नका. स्वत:साठी भरपूर वेळ काढाल.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN -Thursday, June 1, 2023)
स्वभाव बदलण्याची तातडीने गरज आहे. नवीन उपक्रम राबवाल. घराचे सुशोभिकरण कराल. मिळालेला रिकामा वेळ वाया घालवू नका. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. ब्युटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. गुंतवणुकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्याल.
शुभरंग : गुलाबी

कुंभ (AQUARIUS – Thursday, June 1, 2023)
देवीची आरती करा. आज आनंदाचे क्षण अनुभवाल. धनलाभाची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित कराल. मनासारखे फळ मिळेल. सायंकाळी जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाचा व्याप वाढेल. तीर्थयात्रा कराविशी वाटण्याची शक्यता आहे. प्रवास सुकर होईल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Thursday, June 1, 2023)
खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासाठी वेळ काढाल. घरगुती वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्या. कलाकौशल्यात नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सकाळी हिरव्यागार गवतावरून चाला. मित्रमंडळींसोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढा. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : काळा