Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’ 3 जून’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, June 3, 2023)
धोकादायक व्यवहारांपासून लांब राहावे लागेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आपला विचारांना पाठिंबा देतील. व्यवसायात कौशल्याची चुणूक दाखवावी लागेल. सायंकाळी मित्रमंडळींसोबत वेळ वाया घालवू नका. आजचा दिवस अविस्मरणीय असेल. अतिरिक्त झोपेमुळेही आरोग्यावर विपरित परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. आहारात फळांचा समावेश करा.
शुभरंग : नारिंगी

वृषभ (TAURUS – Saturday, June 3, 2023)
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. उगाचच कोणाला दुखवू नका. जुन्या मैत्रिणीची अचानक भेट होईल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. स्वत:साठी वेळ काढाल. अनाथ मुलांना यथाशक्ती मदत करा. नको त्या विषयावर चर्चा करू नका.
शुभरंग : तांबडा

मिथुन (GEMINI – Saturday, June 3, 2023)
कुमारिकांना तांदळाची खीर खाऊ घाला. आर्थिक समस्या सुटण्याची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचे वेळापत्रक धावपळीचे असेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. योग्य व्यक्तिकडून सल्ला घ्याल. मन प्रसन्न ठेवण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. आवडीच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन कराल.
शुभरंग : पिवळा

कर्क (CANCER – Saturday, June 3, 2023)
इतरांचा आदर करा. प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी लागेल. मिळालेला वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत सहलीला जाण्याचे योग आहेत. घरातील फुलदाणीत पांढऱ्या रंगाची गुलाबाची फुले ठेवा. कला जोपासण्यासाठी वेळ द्याल. अतिविचार करू नका. यासाठी मनाला ध्यानधारणा, जपजाप्य करण्याची सवय लावा. आवडता पोषाख परिधान करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : हिरवा

सिंह (LEO – Saturday, June 3, 2023)
आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा. योगासने, व्यायाम यासाठी वेळ काढावा लागेल. आज सिनेमा पाहण्याासाठी किंवा आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. नोकरी-व्यवसायात नफा होईल. सकाळी आराध्य देवतेचे दर्शन घ्या. वाणसामानाच्या खरेदीसाठी वेळ काढाल. अतिचिंता करू नका.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Saturday, June 3, 2023)
आवडत्या व्यक्तिला लाल रंगाची भेटवस्तू द्या. कुटुंबासोबत वेळ घालवाल. अनुभवी लोकांशी जवळीक साधा. वादविवादात वेळ वाया घालवू नका. क्षुल्लक कारणावरून कोणाशीही भांडू नका. वेळेचा सदुपयोग करा. घरातील तणावयुक्त वातावरण निवळेल. आर्थिक गुंतवणुकीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. समाजात मान मिळेल.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA- Saturday, June 3, 2023)
पुजाऱ्यांना सोवळे दान करा. हवेत इमले बांधू काही उपयोग नाही. सायंकाळी बागेत फिरायला जाल. रागावर नियंत्रण मिळवा. आजचा दिवस यशदायी आहे. आरोग्याची काळजी घ्या. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अतिखर्च टाळा. गणपतीला 21 दूर्वा वाहा किंवा अथर्वशीर्षाचे पारायण करा. कलेतील कौशल्य वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : निळा

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, June 3, 2023)
लहान मुलांना गोड पदार्थ खाऊ घाला. मित्रांच्या मदतीने अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. अति बोलणे टाळा. मिळालेला रिकामा वेळ सिनेमा पाहण्यात घालवाल. थोडेसे अजून प्रयत्न केले तर यश मिळू शकेल. सकाळी कोवळ्या हिरव्यागार गवतावरून चाला. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत आजचा दिवस उत्तम जाईल. जुन्या गुंतवणुकीकडे लक्ष द्याल.
शुभरंग : जांभळा

धनु (SAGITTARIUS – Saturday, June 3, 2023)
सकाळी सूर्याचा जप करा. कौटुंबिक अडचणींविषय कुटुंबातील व्यक्तिंशी मनमोकळेपणाने बोला. सकारात्मक राहा. करमणुकीवर खर्च कराल. योजना सफल होण्यासाठी मेहनत घ्याल. प्रलंबित अडचणी लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तिशी कटू वागू नका. झाडांची निगा राखा.
शुभरंग : पिवळा

मकर ( CAPRICORN – Saturday, June 3, 2023)
काळे बूट किंवा काळ्या रंगाच्या छत्रीचे आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तिला दान द्या. व्यसनं टाळा. समाजात कौतुक होईल. धार्मिक कार्यात भाग घ्यावासा वाटेल. व्यवसायातील नव्या संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. बोलताना मधुरावाणीचा वापर कराल. अनपेक्षितपणे पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : निळा

कुंभ (AQUARIUS – Saturday, June 3, 2023)
इष्टदेवतेची दररोज पूजा करा. सतत चिडचिड करणे टाळा. गरजेला मित्र धावून येतील. भाग घेतलेल्या स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिसाठी वेळ काढाल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. आजार बरा होण्याची वेळ जवळ आली आहे. सौंदर्याची काळजी घ्या. आहार, झोप, दैनंदिन कामे वेळच्या वेळी करा.
शुभरंग : आकाशी

मीन (PISCES – Saturday, June 3, 2023)
खिशात पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवा. आजचा दिवस आनंदात जाईल. मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. घरात बांबूचं शोभेचं झाड ठेवा. तुमच्यातील कलेला योग्य व्यासपीठ मिळेल. नोकरीत सहकारी सहाय्य करतील. आवडी जोपासण्याकरिता वेळ काढाल. घरातील सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्याल. आवडीचा पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : मोरपिसी