Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा “2 मार्च”चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, March 2, 2023)
आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा असेल. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घ्याल. मारुतीरायाचे दर्शन घ्या. कामाचे नीट नियोजन करा. भीमरुपी स्तोत्र म्हणा. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आवडती कला जोपासण्याची संधी मिळेल. प्रलोभने टाळावी लागतील. कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Thursday, March 2, 2023)
श्रीविष्णुचे दर्शन घ्या. सावधगिरी बाळगा. नवीन गोष्टी शिका. आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा. भविष्यातला काळ सुखावह जाण्याकरिता आतापासूनच प्रयत्न कराल. मनातील गुपिते योग्य व्यक्तिकडे बोलून दाखवा. अनावश्यक वेळ वाया घालवू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनपेक्षितपणे एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : नारिंगी

मिथुन (GEMINI – Thursday, March 2, 2023)
शिव मंदिरात जाऊन अभिषेक घाला. मन स्थिर ठेवले तरच आनंद घेता येईल. आनंद दुसऱ्या कुणाच्या सुखदु:खावर अवलंबून ठेवणे ही दु:खाची पहिली पायरी आहे. स्वत:च्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्या. स्वत:कडील चांगल्या वस्तू हरवू नका. त्यांची काळजी घ्या. कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न कराल. तुळशीच्या रोपट्याला पाणी घाला. सूर्यनमस्कार घाला.
शुभरंग : राखाडी

कर्क (CANCER – Thursday, March 2, 2023)
कुलदेवतेचे स्मरण करा. कुमारिका शेवेची खीर खाऊ घाला. वर्तमानातला आनंद मनापासून उपभोगा. जोडीदाराकडून भक्कम साथ मिळेल. भविष्यातील गोष्टींचा अतिविचार करू नका. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला संकल्प करून तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करा. आवडती व्यक्ती अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

सिंह (LEO – Thursday, March 2, 2023)
आज दत्तगुरुंचे दर्शन घ्या. मनाला हवे तसे घडेल. एखाद्या गोष्टीचा उगाच बाऊ करू नका. विचार कमी करा. प्रसन्न राहा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. मन शांत राहिल, अशा गोष्टी करण्याचा ध्यास लावून घ्या. सकारात्मक राहा. येणारे नवीन वर्ष तुम्हाला चांगलेच जाणार आहे. घरातील लहान मुलांना त्यांचा आवडता खाऊ द्या. खरेदीला जाण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग: पांढरा

कन्या (VIRGO -Thursday, March 2, 2023)
आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. न आवडणाऱ्या गोष्टी घडल्या तरीही अजिबात मनाला लावून घेऊ नका. श्री नवग्रह स्तोत्र वाचा. पक्ष्यांना खाऊ घाला. आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील. मन प्रसन्न ठेवा. आवडता पदार्थ आवश्यक तेवढाच खा. लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. अन्नदान करा.
शुभरंग : चॉकलेटी

तूळ (TULA- Thursday, March 2, 2023)
चंचल मन स्थिर करणारे दत्तात्रेय स्तोत्र रोज म्हणा. आहाराची पथ्ये पाळावी लागतील. लोकं तुमच्याकडे सल्ला विचारायला येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. मित्रमंडळींविषयी असलेले मतभेद वेळच्या वेळी दूर करा. दिव्यांग व्यक्तिंना मदत करा. सायंकाळी खास योजना आखाल. नव्या उपक्रमात गुंतवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. पैसे बचतीची सवय लावा.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, March 2, 2023)
विश्रांती घेण्यासाठी वेळ काढाल. कामात व्यस्त राहाल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पालकांना विश्वासात घेऊन मानतले गुपित सांगा. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल. वेळेची किंमत लक्षात घ्या. मिळालेला वेळ पुस्तकवाचनात घालवा. आवडती फुलझाडं अंगणात लावा. भूतकाळातील अप्रिय घटनांचे चिंतन करत बसू नका.
शुभरंग : चंदेरी

धनु (SAGITTARIUS – Thursday, March 2, 2023)
गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या. कुठल्याही गोष्टीची घाई करू नका. सध्याच्या काळात फारशा अडचणी वाढणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील जुनी, फाटलेली पुस्तके वेळीच दुरुस्त करा. नवे नातेसंबंध जोडाल. तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे खर्च होतील. कामात उत्साह आणि चिकाटी दाखवाल.
शुभरंग : केशरी

मकर ( CAPRICORN – Thursday, March 2, 2023)

मोकळ्या हवेत फिरायला जाल. जोडीदाराकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेत्तृत्व कराल. आज तुमचे मन शांत राहिल. घराची स्वच्छता करण्यासाठी वेळ द्याल. सूर्याचे आदित्य ह्रदय स्तोत्र वाचा. अडचणी हळूहळू कमी होतील. सकारात्मक राहा. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Thursday, March 2, 2023)
गणपती स्तोत्र वाचा. कौटुंबिक सुखप्राप्तीसाठी 28वेळा ओम म्हणा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दूरचे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. अनुभवी लोकांशी जवळीक साधा. आज सायंकाळी जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. बुद्धिची चांगली साथ लाभेल. आपल्या अडचणी दूर होतील. स्वत:साठी वेळ काढा. सौंदर्याची काळजी घ्या.
शुभरंग : गुलाबी

मीन (PISCES – Thursday, March 2, 2023)
उगाचच आरोग्याची काळजी करत बसू नका. व्यर्थ खर्च करत बसू नका. घरगुती कामं कंटाळवाणी होतील. प्रियकराकडून आश्चर्याचा सुखद धक्का देणारी गोष्ट घडेल. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. रिकाम्या वेळेचा आनंद घ्या. नव्या मित्रांशी घनिष्ठ संबंध जोडाल. गायीला हिरवा चारा खाऊ घालाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. आपल्यातील कलाकौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न कराल. द्विधा मन:स्थिती टाळा.
शुभरंग : पांढरा