Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा “15 मार्च”चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, March 15, 2023)

आरोग्याची काळजी घ्या. गणपती किंवा विष्णु मंदिरात तुपाचा दिवा लावा. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा कराल. नवीन पुस्तकाची खरेदी कराल. प्रिय व्यक्तिचा सहवास मिळेल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. कोणाशीही वादविवाद घालू नका. कुटुंबियांच्या मतांचा विचार कराल.
शुभरंग :
हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, March 15, 2023)
खिशात हिरव्या रंगाचा रुमाल ठेवा. रखडलेली कामे पूर्ण कराल. लोकांची देणी वेळच्या वेळी देऊन टाका. प्रिय व्यक्तिपासून दूर राहणे कठीण होईल. घरात शोभेच्या वस्तू आणाल. कुटुंबियांना वेळ द्याल. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल. आवडत्या व्यक्तिसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Tuesday, March 15, 2023)
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मन:शांती मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. लोकांसोबत वेळ घालवाल. वरिष्ठ कौतुक करतील. व्यवसायात नवीन संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत सहलीला जाण्याचा प्लान आखाल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Tuesday, March 15, 2023)
शिवमंदिरात जाऊन अभिषेक करा. आर्थिक व्यवहारात सुधारणा कराल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय करू शकाल. वेळेचा सदुपयोग कराल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. जोडीदारामुळे आज काही आनंददायी क्षणांचा अनुभव घ्याल. नवीन संपर्कात वाढ होईल.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Tuesday, March 15, 2023)
चांगल्या आरोग्यासाठी दररोज सकाळी कोवळ्या उन्हात चालायला जा. व्यवसायानिमित्त तातडीचा प्रवास करावा लागेल. व्यक्तित्वात सकारात्मक बदल होईल. स्वत:साठी वेळ काढाल. आजचा दिवस सकारात्मक फळ देणारा असेल. समाजात तुमचे कौतुक होईल. मनाजोगी खरेदी कराल. पैसे कमवण्याची नवीन संधी सापडेल.
शुभरंग : नारिंगी

कन्या (VIRGO – Monday, March 15, 2023)
आहारात मधाचा उपयोग करा. आज नेहमीच्या कामापेक्षा वेगळे काम करावेसे वाटण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट झाल्यामुळे आनंदी व्हाल. सकाळी बागकामासाठी वेळ द्याल. लोकं तुमच्याशी स्नेहपूर्वक वागतील. कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल. कोणालाही शब्द देण्यापूर्वी तुमच्या कामावर परिणाम होत नाही, याबाबत काळजी घ्याल.
शुभरंग : केशरी

 तूळ (LIBRA- Tuesday, March 15, 2023)

घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. ध्येयं आणि उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. घरातील प्रलंबित कामे पूर्ण कराल. मानसिक बळ वाढवण्याकरिता चालना मिळेल. सौंदर्याची काळजी घ्याल. आजचा दिवस व्यस्त असेल. स्वत:साठी वेळ काढाल. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पिवळा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, March 15, 2023)
समाजात वरिष्ठ, विद्वान, बुद्धिजीवी लोकांना मान द्या.कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत आजचा दिवस एकदम छान जाईल. आपले गुपित उघड करू नका. तुम्ही आखलेल्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड करू नका. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवाल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. जोडीदार आज तुमच्यासाठी पैसे खर्च करेल.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, March 15, 2023)
हातात चांदीचे कडे घाला. मूड बदलण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. पैसे साठवण्याकरिता गुंतवणूक कराल. आहारात थंड अन्नपदार्थांचा समावेश करा. कला, छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : राखाडी

मकर ( CAPRICORN – Tuesday, March 15, 2023)
घरातील वरिष्ठांकडून पैसे बचतीचे सल्ले घ्याल. शांत आणि तणावमुक्त राहाल. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर जोडीदार पुन्हा तुमच्याशी प्रेमाचा संवाद साधेल. व्यवसायातील अनुभवी लोकांची मदत घ्याल. आवडती कला, छंद जोपासाल. लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चिंतामणी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, March 15, 2023)
कार्यालयात जाण्याआधी केशरमिश्रित पदार्थ खा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवू शकते. कामावर लक्ष एकाग्र करावे लागेल. घरातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी कानी येईल. एकांतात वेळ घालवावासा वाटेल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहावेसे वाटतील. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Tuesday, March 15, 2023)
हनुमानाची पूजा करा. मारुती स्तोत्रा पाठ म्हणा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. इतरांमधील दोष शोधत राहाणे टाळा. आवडत्या व्यक्तिसोबत वेळ घालवाल. आईवडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आहारात गुलकंदाचा समावेश करा.

शुभरंग : निळा