Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा “16 मार्च”चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, March 16, 2023)
मनोराज्यात फार काळ रमू नका. घरातील लोकं दुखावतील असे वागू नका. व्यवसायात नफा मिळेल. प्रिय व्यक्तिसोबत फिरायला जाण्याचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. जोडीदाराकडून आज मनाजोगी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबिय आणि मित्रमंडळींसाठी आज पुरेसा वेळ काढाल. दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचा.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Thursday, March 16, 2023)
क्रिस्टल बॉल घरात आणा. अति चिंता करू नका. इतरांच्या कामात नाक खुपसणे टाळा. सौंदर्यवाढीसाठी नैसर्गिक उत्पादनांचा वापर कराल. सायंकाळी आजारी नातेवाईकांना भेटायला जाल. रजनीगंधाची फुले घरातील फुलदाणीत ठेवा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी निवांत वेळ काढाल. आवडता पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल. गणपती संकटनाशन स्तोत्राचे वाचन करा.
शुभरंग : पांढरा

मिथुन (GEMINI – Thursday, March 16, 2023)
गणपतीला हिरव्यागार, कोवळ्या 21 दुर्वा वाहा. तुमच्या विनयशील वागण्याचे कौतुक होईल. लोकं तुमचे कौतुक करतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न कराल. घनिष्ट मित्रांसोबत रिकामा वेळ घालवाल.
शुभरंग : लाल

कर्क (CANCER – Thursday, March 16, 2023)
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. अचानक पैशाची गरज लागण्याची शक्यता आहे. कामाच्या जागी नवीन जाबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शिव मंदिरात जाऊन दूध-पाण्याचा अभिषेक घाला. आजचा दिवस आनंददायक आहे. स्वत:साठी वेळ काढाल. जुन्या मैत्रिणीची अचानक भेट होण्याची शक्यता आहे. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : खाकी

सिंह (LEO – Thursday, March 16, 2023)
काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनचे बूट घाला. आजचा दिवस करमणुकीचा आहे. प्रवास जास्त झाल्याने थकून जाल. अपेक्षित फळ मिळण्यासाठी प्रयत्न कराल. आरोग्याची काळजी घ्या. कोणालाही आश्वासने देण्याच्या फंदात पडू नका. दररोज सकाळी सूर्यनमस्कार घाला. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Thursday, March 16, 2023)
शिवपिंडीवर अभिषेक करा. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात रमाल. मैदानी खेळात भाग घ्याल. घराबाहेर पडताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. व्यर्थ भांडण करू नका. गरजेच्या वेळी मित्रांचा पाठिंबा मिळेल. लोकं तुमच्याकडे सल्ला मागतील. योग्य व्यक्तिकडे व्यक्त होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : केशरी

तूळ (LIBRA- Thursday, March 16, 2023)
काळ्या रंगाचे चामड्याचे बूट वापरू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल. ज्येष्ठ व्यक्ती आज तुमचे कौतुक करतील. स्वत:साठी थोडा वेळ राखून ठेवाल. वाण सामान खरेदीसाठी वेळ काढाल. विनाकारण वादविवाद घालू नका. आजोबा, मामा नात्यातील या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, March 16, 2023)
वटवृक्षाला गोड दूध घाला. करियरमध्ये योग्य पावले उचला. स्वत:साठी वेळ काढा. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. कार्यालयातील सहकाऱ्यांना समजून घ्याल. छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. बोलताना मधुरावाणीचा उपयोग करा.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Thursday, March 16, 2023)
चांदीचे नाणे खिशात ठेवा. नातेवाईकांसोबत हास्यविनोदाने राहा. मनावरील दडपण कमी होईल. आजचा दिवस आरामदायक आहे. इतरांच्या गुणांचे बारकाईने निरीक्षण कराल. जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे ठरवलेला बेत रद्द होण्याची शक्यता आहे. संकल्पना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : गुलाबी

मकर ( CAPRICORN – Thursday, March 16, 2023)
गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. उत्साह वाढेल. मित्र उधार मागण्याची शक्यता आहे. पैशाचा वापर काटकसरीने करावा लागेल. कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा. शेजाऱ्यांना मदत कराल. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Thursday, March 15, 2023)
दु:खी व्यक्तिला मदत करावी लागेल. स्वत:च स्वत:चे कौतुक करण्यात वेळ वाया घालवू नका. पूर्वीची निराशा दूर सारण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. कामातून नवीन संपर्क, ओळखी होतील. पिंपळाच्या झाडाखाली खडीसाखर ठेवा. कुटुंबियांना वेळ द्याल. अंघोळीच्या पाण्यात कापूरतेल घाला.
शुभरंग : निळा

मीन (PISCES – Thursday, March 16, 2023)
घरातील लहान मुलांमुळे आजची सायंकाळ प्रसन्न राहिल. रात्री चुलीच्या आगीला दुधाने विझवाल. रात्रीच्या जेवणाचा मस्त प्लॅन कराल. घरातील वातावरण हलकेफुलके राहिल. प्रिय व्यक्ती आज तुमच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ देईल. आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. जोडीदार तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करेल.
शुभरंग : पिवळा