Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा “17 मार्च”चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, March 17, 2023)

कामात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभाचा योग आहे. आहार-विहाराची काळजी घ्या. केशरी रंगाचा पोषाख परिधान करा. गाईला ताजी पोळी खाऊ घाला. मारुतीच्या देवळात जाऊन शेंदूर वाहा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Friday, March 17, 2023)
परदेशातील कामाची संधी येण्याचा योग आहे. कौटुंबिक नातेसंबंधात सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. पैसे गुंतवण्याच्या कामात घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : लाल

मिथुन (GEMINI – Friday, March 17, 2023)
कुटुंबियांचा सल्ला घेऊन कामे पूर्ण कराल. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. धन लाभाचा योग आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या नातेसंबंधात तणाव येऊ देऊ नका. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. गरिबांना फळांचे दान करा. आरोग्याची काळजी घ्या. स्वत:साठी वेळ काढाल.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Friday, March 17, 2023)
आपली कामे वेळच्या वेळी करा. आळस टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कोणालाही पैसे उधार देऊ नका. प्रकृतीला जपा. घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा. घरातील खिडक्यांना पांढऱ्या रंगाचे पडदे लावा. समाजात तुमचे कौतुक होईल. दररोज सकाळी 11 सूर्यनमसस्कार घाला. अतिउत्साही वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Friday, March 17, 2023)
रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठ अधिकारी कामात मदत करतील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. अन्नदान करा. शिवपिंडीवर अभिषेक करा. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी थंड पदार्थांचा आहारात समावेश करा. कोणावरही तुमचे निर्णय लादू नका.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Friday, March 17, 2023)
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. लोकरीची शाल गरजू व्यक्तिला द्या. सायंकाळी समुद्रकिनारी फिरायला जाल. सामाजिक कार्यात भाग घ्यावासा वाटेल. आवडते पुस्तक वाचाल.
शुभरंग : केशरी

तूळ (LIBRA- Friday, March 17, 2023)
प्रिय व्यक्तिला भेटायला जाण्याआधी साखर खाऊन जा. घरातील लहान मुलांना वेळ द्याल. सायंकाळी मौजमजा करण्याचा बेत आखाल. कामाच्या दर्जामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. घराचे सुशोभिकरण करावेसे वाटेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
शुभरंग : नारिंगी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, March 17, 2023)
करियरकडे लक्ष द्या. प्रॉपर्टीतून लाभ होईल. कुटुंबात सुखाचे दिवस येतील. लांबचा प्रवास करू नका. अहंकार दूर ठेवा. चॉकलेटी रंगाचा पोषाख परिधान कराल. गरिबांना फळांचे दान करा. आरोग्य चांगले राहिल. जोडीदारासोबत छान वेळ व्यतीत कराल. ज्येष्ठांनी त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करावा. कामाच्या ठिकाणी आज विशेष अनुभव येईल.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Friday, March 17, 2023)
मनातील चिंता दूर होतील. कामात यश मिळेल. कुटुंबिय सुखी-समाधानी असतील. सरकारी कामे वेळच्या वेळी पूर्ण कराल. अनोळखी व्यक्तिंवर विश्वास ठेवू नका. गायीला चारा खाऊ घाला. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. त्रिफळा चुर्णाचा वापर करा. घनिष्ट मित्रांसोबत रिकामा वेळ घालवाल. स्वत:ला क्रिएटिव्हा कामात गुंतवाल. दिनक्रम व्यस्त असेल.
शुभरंग : गुलाबी

मकर ( CAPRICORN – Friday, March 17, 2023)
आरोग्याची काळजी घ्या. सुखसुविधांमध्ये वाढ होईल. उत्साह वाढेल. दुरून एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. अपूर्ण राहिलेली कामे वेळीच पूर्ण कराल. देवळात खडीसाखर किंवा गुळाचा प्रसाद वाटा. अंघोळीच्या पाण्यात कापूर घाला.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Friday, March 17, 2023)
करियरमध्ये प्रगती करण्याचा काळ आहे. जमिनीशी संबंधित व्यवहार होण्याची शक्यता आहे. खर्चात काटकसर करावी लागेल. लोकं तुमच्याकडे सल्ला मागतील. घरातील फुलदाणीत 4 पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले ठेवा. आकाशी रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : निळा

मीन (PISCES – Friday, March 17, 2023)
आपल्या कामात प्रगती करण्याचा काळ सध्या सुरू आहे. लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ब्युटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. भविष्यातील तुमच्या योजनांचा आढावा घ्या. जवळच्या व्यक्तिंसोबत वादविवाद घालू नका. आजचा दिवस लाभदायक आहे.
शुभरंग : पिवळा