
मेष (ARIES – Wednesday, March 22, 2023)
आळस झटकून कामाला लागा. प्रवासात प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट होईल. कुटुंबात भांडणाचे विषय टाळा. चुका टाळण्यासाठी आत्मपरीक्षण करा. मौल्यवान वस्तूंची खरेदी करताना काळजी घ्या. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तब्येत सुधारण्याकरिता संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : मोरपिसी
वृषभ (TAURUS – Wednesday, March 22, 2023)
प्रिय व्यक्तिशी आदराने वागा. दुसऱ्याला आश्वासन देताना विचार करा. जबाबदारीची कामे करावी लागतील. कामाचा व्याप कमी करण्याचा प्रयत्न कराल. विरोधकांना चोख उत्तर देण्याची घाई करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील खर्चाबाबत सावध राहावे लागेल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे.
शुभरंग : मोती
मिथुन (GEMINI – Wednesday, March 22, 2023)
विश्रांतीसाठी वेळ काढाल. संयमाने परिस्थिती हाताळाल. वादाचे विषय टाळा. मैत्रीमध्ये अचानक काही वादाचे प्रसंग येतील तेव्हा सबुरीने घ्या. अनोळखी व्यक्तिंसोबत व्यवहार करताना दक्षता बाळगा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका. शब्दाने शब्द वाढवू नका. संयम राखा. नवीन पोषाखाची खरेदी कराल.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Wednesday, March 22, 2023)
जाणकार व्यक्तिच्या सल्ल्याने वागा. अतिसाहस करायला जाऊ नका. अनोळखी लोकांच्या गाठीभेटी होतील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्याल. कोणावरही विसंबून राहू नका. आर्थिक व्यवहाराबाबत जागरुक राहा. व्यवसायात नवीन योजना आखाल. आवडत्या वस्तूची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आवडता गोड पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : राखाडी
सिंह (LEO – Wednesday, March 22, 2023)
स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. कुटुंबासाठी वेळ द्याल. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करा. आरोग्याची काळजी घ्या. गणपतीची आराधना करा. अथर्वशीर्षाचा पाठ करा. चंचल स्वभावाला आवर घालावा लागेल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : राखाडी
कन्या (VIRGO – Wednesday, March 22, 2023)
नवीन ओळखी होतील. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. घरगुती समस्यांकडे लक्ष घालावे लागेल. प्रवासाचे छोटे-मोठे योग संभवतात. नवीन उद्योग सुरू कराल. नोकरीत केलेले श्रम फायद्याचे ठरतील. खरेदी करताना उधळेपणा टाळा. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखवू नका.
शुभरंग : खाकी
तूळ (LIBRA- Wednesday, March 22, 2023)
इतरांच्या अनुभवातून शिकाल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. आपल्या वक्तृत्वाची इतरांवर छाप पडेल. सायंकाळचा वेळ मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात घालवाल. आवडत्या व्यक्तिकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नको तिकडे धाडस दाखवायला जाऊ नका. दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला. मराठी नववर्षानिमित्त केलेला संकल्प लाभदायक ठरेल.
शुभरंग : पांढरा
वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, March 22, 2023)
संयम राखाल. खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. प्रिय व्यक्तिच्या ह्रदयात स्थान मिळवाल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अडथळे कमी होतील. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहिल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंना खूश ठेवा. सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धनलाभ होईल.
शुभरंग : नारिंगी
धनु (SAGITTARIUS – Wednesday, March 22, 2023)
प्रलोभनांपासून दूर राहा. हाती घेतलेले काम लवकर पूर्ण कराल. गर्भवती महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी. व्यसने आणि अनावश्यक पैसे खर्च करणे टाळा. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पारिजातकाचे झाड घराच्या अंगणात लावून त्याची निगा राखा. आवडता गोड पदार्थ अनपेक्षितपणे पानात वाढला जाईल.
शुभरंग : जांभळा
मकर (CAPRICORN – Wednesday, March 22, 2023)
तुमच्या गुणांचे लोकं कौतुक करतील. कोणालाही जामीन राहू नका. पैशाच्या मोहात पडू नका. नातेवाईक आणि मित्र यांच्यासाठी वेळ काढाल. नवीन कला आत्मसात कराल. नको त्या व्यक्तिंवर विश्वास ठेवू नका. जबाबदारीत वाढ होईल. आज ब्यूटिपार्लरसाठी पैसे खर्च होतील. जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
शुभरंग : जांभळा
कुंभ (AQUARIUS – Wednesday, March 22, 2023)
सामाजिक कार्यात भाग घ्याल. गुरुजनांच्या आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार ठेवा. प्रिय व्यक्तिंसोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज वेळ मिळेल. घरातील ज्येष्ठांचा योग्य मान राखा. प्रिय व्यक्तिबाबत गैरसमज करून घेऊ नका. कडुलिंब, गूळ आणि धण्याचा प्रसाद वाटा.
शुभरंग : मोती
मीन (PISCES – Wednesday, March 22, 2023)
अनावश्यक बोलू नका. स्वत:ला घडवण्यासाठी वेळ द्याल. मानसिक त्रास दूर होण्याकरिता ध्यानधारणा करा. कोणालाही आश्वसन देऊ नका. घरातील अडचणी सर्वांच्या विचाराने सोडवाल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होण्याचा आज योग आहे. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातीथ्य कराल.
शुभरंग : चंदेरी