Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’23 मार्च’चे राशीभविष्य 

मेष (ARIES – Thursday, March 23, 2023)
प्रवासात जपून राहा. आपल्या मेहनतीला यश मिळेल. गोड आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. तिजोरीत मोगऱ्याची फुले ठेवा. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील लहानांना समजून घ्याल. घरातील कर्तव्ये पार पाडावी लागतील.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Thursday, March 23, 2023)
आहारविहाराकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण चिडचिड करू नका. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अभ्यासातील अडचणी योग्य मार्गदर्शनाने सोडवा. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. उगाच कोणतीही शंका मनात बाळगू नका.
शुभरंग : मोती

मिथुन (GEMINI – Thursday, March 23, 2023)
विचार करूनच गुंतवणूक करा. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. कलेतील कौशल्य आत्मसात करायला जास्त मेहनत घ्यावी लागेल. घराच्या सुशोभिकरणासाठी पैसे खर्च होतील. जोडीदारासोबत भांडण, वादविवाद टाळा. वाहन काळजीपूर्वक चालवा. लाल रंगाचे फूल देवाला वाहा.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Thursday, March 23, 2023)
सर्वांशी आदराने वागा. उगाचच भावनेला बळी पडू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवून चार पैसे शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करा. झोपण्याकरिता चटईचा वापर करा. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. जोडीदारासाठी खास वेळ काढाल. खरेदी मनाजोगी होईल.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Thursday, March 23, 2023)
कार्यालयात जबाबदारी वाढेल. पिण्याच्या पाण्यात वाळा घाला. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. कोणालाही उधार देऊ नका. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा. मनाच्या शांततेकरिता अथर्वशीर्ष म्हणा. आर्थिक आवक पाहून खर्च करा.
शुभरंग : राखाडी

कन्या (VIRGO – Thursday, March 23, 2023)
नवीन परिचय फायदेशीर ठरतील. नोकरी-व्यवसायात जबाबदारीने वागावे लागेल. विवादापासून लांब राहाल. घरातील वातावरण आनंददायी ठेवा. व्यसने टाळा. तज्ज्ञांचा सल्ला जरूर ऐका. स्वत:च्या क्षमतेचा विचार करा. सकाळी सूर्यनमस्कार घाला.
शुभरंग : खाकी

तूळ (LIBRA- Thursday, March 23, 2023)
स्वत:चेच खरे करू नका. काळवेळ पाहून निर्णय घ्या. स्वत:ला मिळालेले यश तुमच्याविषयी सकारात्मक व्यक्तिंना सांगा. कुटुंबातील वातावरण बिघडू देऊ नका. दररोज व्यायाम करा. एकमेकांच्या मतास प्राधान्य द्या. प्रिय व्यक्तिच्या कामाचे कौतुक करा. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, March 23, 2023)
राग नियंत्रणात ठेवा. गुरुजनांची सेवा करा. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. प्रलोभनांपासून दूर राहा. कलेतील मर्म शिका. प्रिय व्यक्तिसोबत आजची सायंकाळ घालवाल. नवे काम हाती घ्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Thursday, March 23, 2023)
सावध राहा. इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सकाळी नियमितपणे चालणे. शब्द जपून वापरा. सध्या कोणाकडूनही अपेक्षा करू नका. सदा हसतमुख राहा. सकाळी हिरव्यागार गवतावरून चाला. कामाचे नियोजन करून ती पार पाडाल. मेहनतीवर भर द्याल. नोकरीत चातुर्याचा वापर कराल.
शुभरंग : जांभळा

मकर (CAPRICORN – Thursday, March 23, 2023)
गोड बोलून कामे साधून घ्या. मेहनतीची कास सोडू नका. सकारात्मक विचार करा. आरोग्य उत्तम लाभेल. वडीलधाऱ्यांचा वेळोवेळी सल्ला घ्या. भावनांचा अतिरेक करू नका. नोकरी सोडण्याचे विचार मनात येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Thursday, March 23, 2023)
सकाळचा वेळ बागकामात घालावल. एकाग्रतेसाठी गणपतीची आराधना करा. नोकरीत चातुर्याचा वापर करा. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. ब्यूटिपार्लरला जाण्यासाठी वेळ काढाल. घरातील फुलदाणीत शोभिवंत फुले ठेवा. दररोज सकाळी देवदर्शनाला जाल. दिवस उत्साहवर्धक जाईल.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Thursday, March 23, 2023)
अहंकार आणि मोहाला बळी पडू नका. आरोग्य चांगले राहिल. नोकरीचा प्रश्न सुटेल. कामाची जबाबदारी अंगावर पडेल. कोणावरही अवलंबून राहू नका. पैसे वसुलीकडे लक्ष द्या. घरातील सदस्यांना समजून घ्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : चंदेरी