
मेष (ARIES – Friday, March 24, 2023)
सौंदर्यप्रसाधानांसाठी पैसे खर्च कराल. जोडीदाराशी मनमोकळे बोलण्यासाठी वेळ काढाल. घरातील सदस्यांना भावनिक आधार द्याल. हिरव्या रंगाचा पोषाख परिधान करा. घराच्या सुशोभिकरणासाठी वेळ द्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. सकाळचा बागकामासाठी वापराल. नातेवाईकांशी भांडू नका.
शुभरंग : मोरपिसी
वृषभ (TAURUS – Friday, March 24, 2023)
प्रियकर किंवा प्रेयसीला मोती, शंख, शिंपल्यांनी बनवलेल्या भेटवस्तू द्या. इतरांसोबत आनंद वाटून घ्या. राहून गेलेली देणी परत कराल. नवीन प्रकल्पांसाठी निधी जमा कराल. प्रिय व्यक्तिला वचन द्यावे लागेल. तुमचे काम चोख करा. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा. काहीही झाले तरी मूड खराब होऊ देऊ नका. कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहाल.
शुभरंग : मोती
मिथुन (GEMINI – Friday, March 24, 2023)
वाहत्या पाण्यात अख्खा लसूण आणि कांदा प्रवाहित करा. आज मनाला आनंद देणारी घटना घडेल. आज आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल. रिकाम्या वेळेत मोबाईलवर मालिका, वेबसिरीज पाहाल. आरोग्य चांगला परिणाम होईल, अशी दिनचर्या आखा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. ठरवलेली कामे मार्गी लागतील.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Friday, March 24, 2023)
तिजोरीत मोगऱ्याची फुले ठेवा. मैदानी खेळांकडे आकर्षित व्हाल. सुट्टीच्या दिवशी नव्या योजना आखाल. सायंकाळची वेळ मित्रमैत्रिणींसोबत सुखकारकरित्या घालवाल. अनपेक्षितपणे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. पाहुण्यांचे आगत्य करण्यात वेळ जाईल. आजचा दिवस आनंदात जाईल. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : राखाडी
सिंह (LEO – Friday, March 24, 2023)
गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करून तुपाचा दिवा लावा. तुमच्या वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. नवे मित्र जोडाल. दिनचर्या व्यस्त राहिल. जोडीदाराविषयी गैरसमज करून घेऊ नका. जोडीदारासोबत सायंकाळी फिरण्यासाठी वेळ काढाल. कष्टाचे चीज होईल.
शुभरंग : राखाडी
कन्या (VIRGO – Friday, March 24, 2023)
काळ्या आणि पांढऱ्या मोत्याची माळ गळ्यात घाला. राग अनावर होऊ देऊ नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सौंदर्याची काळजी घ्याल. प्राप्त परिस्थितीत समाधान मानावे लागेल. अडचणीच्या वेळी मदत करणाऱ्याच्या बाबतीत कृतज्ञ राहा. घरातल्यांसाठी वेळ काढाल. आहाराबाबत जागरुक राहा. मनाला आवडणाऱ्या गोष्टी कराल.
शुभरंग : खाकी
तूळ (LIBRA- Friday, March 24, 2023)
अन्नदान करा. संयम बाळगा. घरात लागणारे गरजेचे सामान खरेदी कराल. आनंदी, उत्साही, प्रेमळ स्वभावामुळे इतरांचे मन जिंकून घ्याल. नकारात्मक वागणाऱ्या नातेवाईकांपासून दूर राहाल. आजचा दिवस स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर घरकाम यामध्ये जाईल. सुट्टीवर जात असलात तरी काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सर्व काही सुरळीत पार पडेल.
शुभरंग : पांढरा
वृश्चिक ( SCORPIO – Friday, March 24, 2023)
आरोग्य उत्तम राहील. त्रिफळा चुर्णाचा नियमित वापर करा. अनावश्यक प्रसंगांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा घालवू नका. वादविवाद केल्याने काहीही हाती लागणार नाही. हाताखालच्या सहकाऱ्यांना समजून घ्याल. रिकाम्या वेळेत पुस्तकाचे वाचन करू शकाल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. सायंकाळचा वेळ धार्मिक कार्याकरिता वापराल.
शुभरंग : नारिंगी
धनु (SAGITTARIUS – Friday, March 24, 2023)
शनि मंदिरात जा. आरोग्याची काळजी घ्या. लोकांना दुखावू नका. जवळचे मित्र दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. कुणाशीही भांडण करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. नवे प्लान, संकल्पना आखण्याकरिता आणि त्या प्रत्यक्षात राबवण्याकरिता आजचा दिवस चांगला आहे. सायंकाळी दूरच्या नातेवाईकाची भेट होईल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : जांभळा
मकर (CAPRICORN – Friday, March 24, 2023)
शिव मंदिरात जाऊन अभिषेक करा. इतरांसोबत आनंद वाटून घ्याल. मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे खर्च करावे लागतील. रिकाम्या वेळेत तुम्हाला आवडणारी कामे कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. प्रकृतीची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्याल. प्रवासाचे बेत आखाल.
शुभरंग : जांभळा
कुंभ (AQUARIUS – Friday, March 24, 2023)
तरुणींना खाण्याचे प्रदार्थ वितरित करा. मित्रमंडळींसोबत वेळ घालवाल. कोणाच्याही वर्मी लागेल असे बोलू नका. व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहलीला जाऊन मजा लुटाल. शाळकरी मुलांना शालोपयोगी वस्तू देऊन मदत करा. मनाजोगी खरेदी कराल. जवळच्या व्यक्तिकडून धन लाभ होईल.
शुभरंग : मोती
मीन (PISCES – Friday, March 24, 2023)
गरीब मुलींना मदत कराल. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. मौल्यवान वस्तूंची जपणूक करा. लोकांसोबत अनावश्यक बोलण्यात बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. निरपेक्ष प्रेम करायला शिकाल. विनाकारण चिंता करू नका. गरज ही शोधाची जननी असते, हा सुविचार लक्षात ठेवा.
शुभरंग : चंदेरी