Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’29मार्च’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Wednesday, March 29, 2023)
दुधाची पिशवी गरीब महिलेला द्या. आज मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ घालवाल. भविष्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. मनाची द्विधावस्था होऊ देऊ नका. स्वत:साठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. ऑफिसच्या कामात मन लागणार नाही. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Wednesday, March 29, 2023)
वाहत्या पाण्यात चुरमुरे प्रवाहित करा. इतरांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेतल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होईल. आनंदी व्यक्तिमत्त्वामुळे नवीन मित्र जोडाल. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : पांढरा

मिथुन (GEMINI – Wednesday, March 29, 2023)
हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. स्वत:साठी वेळ काढाल. अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्याल. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. बोलताना सावधगिरी बाळगा. आवडते पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे या गोष्टी केल्यामुळे मन रमेल. समाजिक कार्यात भाग घ्याल. पैसे अनावश्यक खर्च करू नका.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Wednesday, March 29, 2023)
सूर्याचा जप करा. सूर्यनमस्कार घाला. नावीन्यपूर्ण कल्पना सुचण्याची शक्यता आहे. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. आज तुमचा दिवस सत्कारणी लागेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नवीन कला आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवाल.
शुभरंग : जांभळा

सिंह (LEO – Wednesday, March 29, 2023)
सायंकाळी क्षणभर विश्रांती घ्याल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. बौद्धिक खेळात सहभागी व्हाल. भविष्यातील योजनांचे बेत आखाळ. प्रवासात ओळखी होतील. नारिंगी रंगाचा पोषाख परिधान करा. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : राखाडी

कन्या (VIRGO – Wednesday, March 29, 2023)
सकाळी तुळशीची पूजा करा. कामे करताना अधूनमधून विश्रांती घ्या. मित्रमैत्रिणींची भेट घ्याल. सदा हसतमुख आणि प्रसन्न राहाल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही अनुकूल असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला येतील. आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

तूळ (LIBRA- Wednesday, March 29, 2023)
कुमारिकांना चिंच, पाणीपुरी खाऊ घाला. आजचा दिवस अत्यंत व्यस्त असेल. लोकांना नेमके तुमच्याकडून काय हवेय, ते समजून घ्यावे लागेल. कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करा. लोकं तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतील.
शुभरंग : लाल

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, March 29, 2023)
घरात दूषित पाणी साठू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. आजच भरपूर मोकळा वेळ मिळेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. मुलांकडून आनंदाची बातमी कानी येईल. कामात प्रगती होईल. प्रिय व्यक्तिंच्या भेटीगाठीचा आनंद घ्याल. जोडीदारासोबत छान वेळ व्यतित कराल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, March 29, 2023)
घरात दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीच्या वेळी कुठल्याही जुन्या गोष्टीची आठवण काढून भांडण करू नका. व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली येऊ नका.
शुभरंग : काळा

मकर (CAPRICORN – Wednesday, March 29, 2023)
आहाराची पथ्ये जपावी लागतील. आर्थिक स्थितीबद्दल काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत सिनेमा पाहायला जाल. घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. प्रिय व्यक्तिकडून सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी खास बेत आखला जाईल. लोकं तुमच्या मताचा विचार करतील.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Wednesday, March 29, 2023)
क्रिस्टल बॉल घरात ठेवा. कुटुंबातील सदस्यांना मदत कराल. छंद जोपासण्यासाठी वेळ खर्च करावा लागेल. प्रेमाने हसून आजच्या दिवसाला सुरुवात करा. एकांतात वेळ घालवणे आवडू लागले. आराम करण्यासाठी वेळ काढाल. सुसंवाद साधण्याची आवश्यकता आहे. घरात सायंकाळी धूप दाखवा. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Wednesday, March 29, 2023)
अन्नदान करा. आजचे महत्त्वाचे निर्णय आजच घ्यावे लागतील. नवे नातेसंबंध लाभ मिळवून देणारे आणि दीर्घकाळ टिकणारे असतील. कष्टाचे चीज होईल. आवडती शोभेची वस्तू घरात आणा. जोडीदार तुमची मते विचारात घेईल. मन प्रसन्न राहिल, अशी कामे कराल. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा.
शुभरंग : गुलाबी