Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’30 मार्च’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, March 30, 2023)

पिंपळ किंवा वडाच्या झाडाला पाणी घाला. आजारातून बरे व्हाल. शेअर बाजारात पैसे गुंतवताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. खरेदीला गेलात तर स्वत:साठी नवीन कपड्यांची खरेदी कराल. जोडीदारासोबत आजची सायंकाळ मनसोक्त गप्पा मारण्यात व्यतित कराल. प्रिय व्यक्तिकडून आवडीची भेटवस्तू मिळेल. घराबाहेर जाताना 2 वेलचीचे दाणे तोंडात ठेवा.
शुभरंग :
शेंदरी

वृषभ (TAURUS – Thursday, March 30, 2023)
गाईला हिरवा चारा खाऊ घाला. दिवसाची सुरुवात योगसाधनेने करा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. गुरुंनी शिकवलेली कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न कराल. निरोप वेळेत पोहोचवा. आवडीचे छंद जोपासाल. अति जास्त प्रमाणात कॉफी पिऊ नका. मनाजोगी खरेदी कराल. अन्नदान करा.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Thursday, March 30, 2023)
अंगणात पिवळ्या रंगाच्या फुलाचे फूलझाड लावा. नातेवाईक, मित्रमंडळींकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदात घालवाल. घरातील जवळच्या व्यक्तिसोबत गप्पा मारण्यात वेळ जाईल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. रोज सकाळी काळ्या मनुका खा.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Thursday, March 30, 2023)
काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला. आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक बाजू मजबूत राहिल. घरात शांतता नांदेल. रखडलेली कामे मार्गी लावाल. जोडीदारासोबत प्रेमाचे भांडण होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या आहारात गाजराच्या कोशिंबिरीचा समावेश करा. सकारात्मक विचार कराल.
शुभरंग : खाकी

सिंह (LEO – Thursday, March 30, 2023)
हिरव्या चण्याच्या भाजीचा आहारात समावेश करा. बोलण्यापूर्वी दोन वेळा विचार कराल. इतरांकडे नको त्या चौकशा करत बसू नका. मौल्यवान भेटवस्तू जवळच्या व्यक्तिकडून मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. अनावश्यक विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Thursday, March 30, 2023)
शुक्र प्रभावित होण्यासाठी इस्त्री केलेले कपडे परिधान करा. आवडते स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या दूर होतील. दूरच्या प्रवासाचा योग आहे. मर्यादा सोडून वागू नका. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज वेळ काढाल. मोगऱ्याचे अत्तर वापरा. घरातील तिजोरीत मोगऱ्याची ताजी फुले ठेवा.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (LIBRA- Thursday, March 30, 2023)
सकाळी सूर्यनमस्कार घाला. माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. अति भावनाविवश होऊ नका. तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. इतरांचे मन दु:खी होईल असे वागू नका. आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढावा लागेल. अतिस्पष्टवक्तेपणावर आवर घालावा लागेल. त्वचेची काळजी घ्या. आवडीच्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : हिरवा

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, March 30, 2023)
झोपतेवेळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराजवळ असलेल्या झाडाच्या मुळांना हे पाणी घाला. महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. रिकाम्या वेळात आवडता सिनेमा पाहाल. कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींसाठी वेळ काढाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सहलीला जाण्याचा प्लान आखाल.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Thursday, March 30, 2023)
लोखंडाचे भांडे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वापरा. तणावमुक्तीसाठी घरातील लहान मुलांसोबत खेळा. आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रिय व्यक्तिने दुस्वास केला तरीही तुम्ही प्रेमाने वागा. कामाच्या दृष्टिने आजचा दिवस सुरळीत जाईल. कार्यालयातून घरी लवकर जाल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल.
शुभरंग : तांबडा

मकर (CAPRICORN – Thursday, March 30, 2023)
प्रवासात नवीन ठिकाणे बघितल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र तुम्हाला आज पाठिंबा देतील. बोलताना जपून बोलावे लागेल. महत्त्वाच्या व्यक्तिंशी गाठभेट होईल. घरातील कचरा वेळच्या वेळी घराबाहेर फेकून द्या. साठवून ठेवू नका. देवळात देवदर्शनासाठी जाल.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Thursday, March 30, 2023)
घरातील वातावरण सकारात्मक राहिल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी चांगल्या प्रकारे समजून घ्याल. घरात चाफ्याच्या फुलांची सजावट करा. कुमारिकांना गोड पदार्थ खाऊ घाला. रिकामा वेळ वाया घालवू नका. रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले दूध प्या.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Thursday, March 30, 2023)
व्यसनांपासून दूर राहा. समस्यांवर हसत हसत मात करा. अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दागिन्यांची खरेदी कराविशी वाटेल. रामरक्षा स्तोत्र म्हणायला आजपासून सुरुवात करा. तुमच्या कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर भर द्याल.
शुभरंग : गुलाबी