Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’31 मार्च’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, March 31, 2023)
आरोग्य चांगले राहिल. सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. एक लाल मिरची, 27 मसूरच्या डाळीचे दाणे किंवा 5 लाल फुले मारुती मंदिरात वाहा. कामात प्रगती होईल. कार्यालयातील वातावरण सकारात्मक राहिल. प्रिय व्यक्तिशी अतिभावूक होऊन बोलू नका. स्वत:साठी वेळ काढाल.
शुभरंग : शेंदरी

वृषभ (TAURUS – Friday, March 31, 2023)
पाळीव कुत्र्याची काळजी घ्या. घरातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. घरातील नातेवाईकाचा विवाह ठरल्याच्या बातमीमुळे आनंदी व्हाल. अचानक कामात व्यस्त होऊन जाल. आवडता पदार्थ सायंकाळी खायला मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराला लाल रंगाची भेटवस्तू द्या. आजचा दिवस उत्साहात घालवाल.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Friday, March 31, 2023)
घराच्या अंगणात लाल गुलाबाचे झाड लावा. मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. आजचा दिवस लाभदायक आहे. घरातील कामे वेळच्या वेळी पूर्ण कराल. टीव्ही किंवा मोबाईलवर आवडता सिनेमा पाहाल. पैशाची देवाणघेवाण होईल. आवडत्या कलेतून समाधान मिळवाल.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Friday, March 31, 2023)
वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामात एकाग्रता साधण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष म्हणा. दिवसाच्या अखेरीस गोड बातमी कानी येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. स्वत:करिता वेळ काढाल. सकाळी सूर्योपासना करा. दररोज व्यायाम करण्याला प्राधान्य द्या. आजचा दिवस लाभदायक आहे.
शुभरंग : खाकी

सिंह (LEO – Friday, March 31, 2023)
संयम ढळू देऊ नका. विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटा. नवीन करार लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कोठेही पैसे गुंतवताना घाईगडबड करू नका. कामाच्या व्यापातून स्वत:करिता वेळ काढण्याची आवश्यकता आहे. मन प्रसन्न राहिल अशी कामे कराल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Friday, March 31, 2023)
गाईला हिरवा चारा खाऊ घाला. ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. स्वत:साठी वेळ काढा. जोडीदाराला खूश ठेवाल. नवीन तंत्रज्ञान शिकावेसे वाटेल. रिकाम्या वेळात आवडीच्या पुस्तकाचे वाचन कराल. मित्रमैत्रिणींसोबत सायंकाळी सिनेमा पाहायला जाल. घराचे सुशोभिकरण करावेसे वाटेल. स्वत:च्या कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (LIBRA- Friday, March 31, 2023)
भूतकाळात रमू नका. हनुमानाला गूळ आणि चण्याचा प्रसाद चढवा. मिळकत वाढवण्याचा विचार कराल. नवीन गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घ्या. चांगल्या संकल्पना सुचतील. कामातला उत्साह वाढेल. परिस्थितीपासून दूर पळू नका. मनासारखा जोडीदार मिळेल. नवीन कला आत्मसात करावीशी वाटेल. जो आवडतो सर्वांना तोची आवडतो देवाला, हे लक्षात ठेवा.
शुभरंग : हिरवा

वृश्चिक ( SCORPIO – Friday, March 31, 2023)
गुरु किंवा वडिलांना गुलाबी रंगाचे वस्त्र भेट द्या. प्रकृतीत सुधारण होईल. गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसे कमावू शकाल. भावंडांचा गरजेच्या वेळी पाठिंबा मिळेल. व्यवसायात स्थिरस्थावर असलेल्या लोकांशी ओळखी होतील. आहारात पथ्यपाळी सांभाळावे.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Friday, March 31, 2023)
पांढऱ्या रंगाच्या शंखाची पूजा करा. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. अंघोळीच्या पाण्यात मीठ घाला. आजचा दिवस राहून गेलेल्या भेटीगाठी घेण्यात घालवाल. शिवमंदिरात भीमसेनी कापूर जाळा, जल अभिषेक करून पांढरे फूल वाहून नमस्कार करा.
शुभरंग : तांबडा

मकर (CAPRICORN – Friday, March 31, 2023)
घरातील मोठ्या स्त्रियांचे आशीर्वाद घ्या. आवडीचा गोड पदार्थ बनवून स्वत: खा आणि इतरांनाही खाऊ घाला. कामाच्या ठिकाणी सहकारी कौतुक करतील. घरातील साफसफाई करण्यात वेळ घालवाल. एकांतात राहावेसे वाटू लागेल. मैत्रिणीसोबत छान गप्पा मारण्यात वेळ जाईल. कुटुंबीय तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवण्याची शक्यता आहे.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Friday, March 31, 2023)
सूर्योदयाच्या वेळी 15 ते 20 मिनिटे सूर्यनमस्कार घाला. दागदागिन्यांची खरेदी कराविशी वाटेल. गृहोपयोगी सामानाची खरेदी कराल. ठरवलेल्या योजना बारगळण्याची शक्यता आहे. कोणाशीही मतभेद वादविवाद घालवण्यात वेळ वाया घालवू नका. सायंकाळी प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. घरातील फुलदाणीत पिवळ्या रंगाची फुले ठेवा.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Friday, March 31, 2023)
आहारात बीट-गाजराच्या सूपचा समावेश करा. अतिखर्च करणे टाळा. महात्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आनंदी राहाल. आवडीचा पोषाख परिधान कराल. नव्या कल्पना सत्यात आणण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. जोडीदाराचे मत विचारात घ्याल. आर्थिक बाबींचे व्यवस्थित नियोजन कराल.
शुभरंग : गुलाबी