Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’22 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, May 22, 2023)
चांदीचे दागिने परिधान कराल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. आजारातून लवकर बरे व्हाल. पैशाची वापर काटकसरीने कराल. शेजाऱ्यांशी वादविवाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. कामाच्या ठिकाणी अनुकूल घटना घडेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Monday, May 22,, 2023)
पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. पायाच्या तळव्यांची काळजी घ्या. भरपूर वेळ मोकळा मिळेल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान आखाल. सायंकाळी दूरचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आरामदायी असेल. तुळशीला सकाळी पाणी घाला.मनाजोगी खरेदी कराल. नवीन संपर्क होतील.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Monday, May 22,, 2023)
वाद आणि भांडणे टाळा. कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडताना घरातील मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. तातडीचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आवडता पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल. घराचे सुशोभिकरण कराल.
शुभरंग : चंदेरी

कर्क (CANCER – Monday, May 22,, 2023)
रिकाम्या वेळेचा आनंद घ्याल. घरातील कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार आज तुमच्यावर वैतागण्याची शक्यता आहे, मात्र सायंकापर्यंत परिस्थिती सुधारेल. घनिष्ठ मित्रांसोबत नवीन प्लान आखाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. परसात सदाफुलीचे झाड लावा.
शुभरंग : सोनेरी

सिंह (LEO – Monday, May 22, 2023)
वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. कायदेशीर सल्ला घ्यावा लागण्याची आवश्यकता आहे. लोकांना दुखवू नका. समाजात कौतुक होईल. शिव मंदिरात जल अभिषेक करून बेलपत्र वाहा. वकिलांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आवडत्या वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : खाकी

कन्या (VIRGO – Monday, May 22, 2023)
सरस्वती देवीला निळ्या रंगाची फुले वाहून तिची पूजा करा. मित्रांचा आधार मिळेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. तुमच्यासाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. उत्तम नफा मिळेल. चांगल्या कामाबद्दल लोकं तुमचे कौतुक करतील. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून घ्याल. केलेल्या गुंतवणुकीचा नफा मिळेल.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Saturday, May 20, 2023)
गाईला ताजी पोळी खाऊ घाला. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कलेतून आनंद मिळेल. लोकं तुमच्या म्हणण्याचा विचार करतील. सकाळी आराध्यदेवतेला नमस्कार करून कामांना सुरुवात करा.
शुभरंग : लाल

वृश्चिक ( SCORPIO – Monday, May 22, 2023)
चांगल्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा. वाळ्याचे सरबत प्या. आराम मिळेल. धन कमवण्याची बरीच संधी मिळेल. कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. पारिजातकाच्या झाड परसात लावून त्याची निगा राखा. प्रवासाची संधी मिळेल.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS -Monday, May 22, 2023)
लाल बांगड्या आणि लाल रंगाचे वस्त्र एखाद्या कुमारिकेला दान द्या. व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहिल. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. नवीन मित्र जोडाल. जुन्या मित्रांना भेटण्याचा प्लान कराल. आवडता पोषाख परिधान कराल. सोमवारी शिव मंदिरात जाऊन अभिषेक करा. घरातील जुनी फाटलेली पुस्तके लवक बाईडिंग करून घ्या.
शुभरंग : केशरी

मकर ( CAPRICORN – Monday, May 22, 2023)
घरातील वातावरण आशादायी असेल. आरोग्याची काळजी घ्या. संकटात मित्र मदतीला धावून येतील. वेळेचा सदुपयोग कराल. नोकरीत वरिष्ठ करतील. हनुमान चालिसा वाचा. मारुती मंदिरात जाऊन प्रदक्षिणा करा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. स्वत:साठी वेळ काढाल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही अनुकूल असेल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Monday, May 22, 2023)
सकाळी सूर्याचे दर्शन घेऊन 11 वेळा गायत्री मंत्र वाचा. विश्रांतीसाठी वेळ काढाल. शरीराला तेलाने मसाज करा. कामानिमित्त परदेशी प्रवास घडण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. एकांतात वेळ घालवावासा वाटेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.
शुभरंग : हिरवा

मीन (PISCES – Monday, May 22, 2023)
भावंडांकडून आर्थिक मदत मिळेल. प्रवासात सामानाची विशेष काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसोबत झालेल्या संवादामुळे हुरुप येईल. नोकरीला चिकटून राहाल. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. मनाजोगी खरेदी कराल. समाजात कौतुक होईल. आहारात साखरेचा समावेश कमी प्रमाणात करा.
शुभरंग : सोनेरी