Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’24 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, May 24, 2023)
कोणाशीही अपशब्द बोलू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वजन घटवण्यासाठी प्रयत्न कराल. अडचणींवर मात कराल. प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर निष्ठा ठेवा. शंका घेऊ नका. व्यवसायात टिकून राहाल. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल.
शुभरंग : आकाशी

वृषभ (TAURUS – Wednesday, May 24, 2023)
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. अनोळखी व्यक्तिच्या सल्ल्याने गुंतवणूक करू नका. सकारात्मक विचार कराल. सूर्याला अर्घ्य द्या. स्वत:साठी वेळ काढाल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. राग हा काही काळापुरताच मर्यादित ठेवा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Wednesday, May 24, 2023)
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान कराल. उत्साहात वाढ होईल. मिळालेल्या संधीचा फायदा घ्याल. मोकळा वेळ घरातील लहान मुलांच्या सहवासात घालवाल. वेळेचा सदुपयोग कराल. धार्मिक कार्यातली आवड वाढेल. प्रवासाचे योग आहेत. अन्नदान करा. जोडीदारासोबत वादविवाद घालू नका. सायंकाळ उत्साहात घालवाल.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER – Wednesday, May 24, 2023)
चांदीच्या ताटात जेवाल. आहाराबाबत काळजी घ्या. जवळच्या मित्राची कामात मदत मिळेल. ज्या व्यक्तिवर तुम्ही जास्त प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. दूरचा केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. मेहनतीला यश मिळेल. निवांत राहाल. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. अंघोळीच्या पाण्यात हळद घाला. मनाजोगी खरेदी कराल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO -Wednesday, May 24, 2023)
मोती किंवा शंखाने तयार केलेली वस्तू भेट म्हणून द्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. कामाच्या जागी एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मत विचारल्यानंतर भीड बाळगू नका. आपल्या मताचे कौतुक होईल. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडाल.
शुभरंग : खाकी

कन्या (VIRGO – Wednesday, May 24, 2023)
कार्यालयातून लवकर घरी जाल. आहारात सूर्यफुलाच्या तेलाचा समावेश करा. जेष्ठ व्यक्तिंशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवू नका. कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. गणपतीला लाल रंगाचे जास्वंदाचे फूल वाहा.
शुभरंग : खाकी

तूळ (LIBRA – Wednesday, May 24, 2023)
चांदीच्या ग्लासातले पाणी प्या. धार्मिक व्यक्तिचे आशीर्वाद लाभतील. भावंड पैसे उधार मागण्याची शक्यता आहे. प्रदर्शनाला भेट द्याल. नवीन लोकांशी संपर्क साधाल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लान आखाल. कुटुंबियांना आनंदाची बातमी द्याल. कामात एकाग्रता साधाल. दत्तबावनी म्हणा. मारुतीच्या देवळात दिवा लावा.
शुभरंग : काळा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, May 24, 2023)
गरजू व्यक्तिची मदत करा. धर्मपरायण व्यक्तिचे आशीर्वाद लाभतील. लोकं तुमचे कौतुक करतील. मनाजोगी खरेदी कराल. नोकरीला चिकटून राहा. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. नवीन नातेसंबंध जोडले जातील. घराचे सुशोभिकरण कराल. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. ज्ञानात भर पडेल.
शुभरंग : खाकी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, May 24, 2023)
पांढऱ्या रंगाची मिठाई गरिबांना वाटा. आरोग्याच्या दृष्टिने आजचा दिवस चांगला आहे. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. तळहाताच्या अंगठ्याजवळील उंचवट्यावर मोगऱ्याचे अत्तर लावा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. रिकामा वेळ मिळेल. जोडीदार तुमच्यासोबत वेळ व्यतित करेल. आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल घाला.
शुभरंग : चंदेरी

मकर ( CAPRICORN -Wednesday, May 24, 2023)
चांदीचे नाणे गंगाजलामध्ये ठेवा. धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे थकलेले कर्ज फेडू शकाल. कामाचा उत्साह वाढेल. कामात व्यस्त राहाल. लोकं तुमची स्तुती करतील. आर्थिक उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील. काचेच्या बाटलीतील पाणी प्या. घराच्या परिसरात गावठी गुलाबाचे झाड लावा.
शुभरंग : मोती

कुंभ (AQUARIUS -Wednesday, May 24, 2023)
खड्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. कार्यालयातून लवकर घऱी जाल. व्यापारात नफा मिळेल. आज कोणीतरी सरप्राईझ देईल. सायंकाळी बागेत वेळ घालवाल. खास व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. गुलाबी रंगाचा पोषाख खरेदी कराल. नातेवाईक अनपेक्षित घरी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Wednesday, May 24, 2023)
पारिजातकाच्या झाडाला पाणी घाला. दिव्यांग व्यक्तीची मदत कराल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक लाभ होतील. मुलांकडून एखादी छान बातमी कानी येईल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढाल. आत्मविश्वास वाढेल. नवीन मित्रमंडळींशी संपर्क साधाल. जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं महत्त्व किती आहे,याची जाणीव होईल.
शुभरंग : आकाशी