Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’25 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, May 25, 2023)
प्रत्येक काम करताना घाई गडबड करू नका. कामे पूर्ण होण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रस्त व्हाल. उधारीच्या व्यवहारापासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आवडती वस्तू विकत घेण्यासाठी वेळ काढा. सूर्यप्रकाशात ठेवलेल्या पाण्याने आंघोळ करा. लोकं तुमच्या कामाचे कौतुक करतील.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Thursday, May 25, 2023)
करियरमध्ये नव्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. मेहनत वाढवण्याची गरज भासू शकते. सुचलेल्या नवीन संकल्पनांवर कामाला सुरुवात कराल. शत्रूंपासून सावध राहा. केशरी रंगाचे कपडे परिधान कराल. गरिबांना फळे वाटा. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडता पदार्थ खायला मिळेल. त्यामुळे आनंदी व्हाल.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI -Thursday, May 25, 2023)
कुटुंबात सुख-समाधान वाढेल. जमीन खरेदीचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठीचा आनंद घ्याल. व्यवसायात वृद्धी करण्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे. हिरव्या रंगाचा पोषख परिधान करा. स्वयंपाकघरात कोरफडीच्या रोपट्याची कुंडी ठेवा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. निसर्गाच आनंद घ्याल.
शुभरंग : तांबडा

कर्क (CANCER – Thursday, May 25, 2023)
बोलताना विचार करून बोला. शिक्षण क्षेत्रातील लोकांना लाभ होईल. दूरच्या नातेवाईकांकडून शुभ बातमी कानी येऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. देऊन किंवा समारंभात अन्नदान करा. काचेच्या बाटलीत ठेवलेले पाणी प्या. गणपतीला 21 दुर्वा वाहा.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO -Thursday, May 25, 2023)
सरकारी कामे मार्गी लागतील. जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या कामाचा लाभ होईल. कुटुंबातील कलह दूर होतील. आवडता पोषाख परिधान करा. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. घरात धार्मिक कार्य पार पडेल. दत्त मंदिरात दर्शनासाठी जा. गाईला गूळ-पोळी खाऊ घाला.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Thursday, May 25, 2023)
नशिबाची साथ मिळेल. कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते. खर्च करताना काटकसर करावी लागेल. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. हिरवा रंग आज आपल्यासाठी लाभदायक आहे. देवळात प्रसादाचे वाटप करा. गरिबांना अन्नदान करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन कला, छंद जोपासाल. घराचे सुशोभिकरण कराल.
शुभरंग : हिरवा

तूळ (LIBRA – Thursday, May 25, 2023)
खर्च काटकसरीने कराल. कोणाशीही वादविवाद घालू नका. मित्रांचे सहकार्य लाभेल. धन लाभाची शक्यता आहे. वाहत्या पाण्यात कुरमुरे सोडा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. शंकराला गोकर्ण वाहा. देवळात खडीसाखरेचा प्रसाद वाटा. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन गोष्ट शिकण्याची कास सोडू नका.
शुभरंग : मोरपिसी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, May 25, 2023)
धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. निर्भिडपणे काम करा. घरातील वातावरण सुखदायक असेल. केशरी रंगाचा पोषाख परिधान करा. आहारात फळांचा समावेश करा. आवडत्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. लोकं तुमच्याशी मनातले गुपित सांगतील. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. केळीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Thursday, May 25, 2023)
मेहनतीला यश येईल. उत्साहाच्या भरात नको ती कामे करायला जाऊ नका. मनातील चिंता दूर होईल. आरोग्य चांगले राहिल. केशरी रंग आज आपल्यासाठी शुभ आहे. गरिबाला चण्याची डाळ द्या. गणपतीच्या देवळात बसून 21 किंवा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा. घरात चिनीमातीची शोभेची वस्तू आणाल. प्रिय व्यक्ती समजून घेईल.
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN -Thursday, May 25, 2023)
समाजात मान-सन्मान मिळेल. जमिनीचे व्यवहार करावेसे वाटतील. मन प्रसन्न राहिल. आर्थिक गुंतवणुकीकरिता नव्या योजनांचा लाभ घेता येईल. आकाशी रंग आपल्यासाठी लाभदायक आहे. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. घरातून राहून गेलेली कामे मार्गी लावाल. प्रिय व्यक्तिशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. लोकं तुमच्या मताचा आदर करतील.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS -Thursday, May 25, 2023)
परदेशात जाण्याची संधी मिळेल. समाजात मानसन्मान मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आर्थिक गुंतवणूक कराल. अनपेक्षितपणे चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. वाणसामानाची खरेदी कराल. लहान मुलांना खाऊ घाला. नव्या कपड्यांची खरेदी करावीशी वाटेल.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Thursday, May 25, 2023)
घरात सुगंधित अत्तर शिंपडा. व्यवसायात प्रगती होईल. जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धतेचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तिशी भेट होईल. अन्नदान करा. केशरी रंग आज आपल्यासाठी शुभकारक आहे. नवीन छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. आवडते संगीत किंवा पुस्तक वाचण्यात वेळ जाईल. मारुती स्तोत्र 11 वेळा म्हणा. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा.
शुभरंग : आकाशी