Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, May 26, 2023 )
समाजात मानसन्मान मिळेल. सणासमारंभानिमित्त मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत बचतीची सवय लावून घ्या. गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Friday, May 26, 2023)
तोंडावर नियंत्रण ठेवा. लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा. मारुतीरायाचे दर्शन घ्या. भीमरुपी महारुद्रा स्तोत्र दररोज सायंकाळी म्हणा. स्वत:च्या सुखाची तुलना इतरांच्या सुखाशी करू नका. आजचा दिवस समाधान आणि आनंदात जाईल. नवीन दागिन्यांची खरेदी करावीशी वाटेल.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI -Friday, May 26, 2023)
दत्तमंदिरात जाऊन दर्शन घ्या. दक्षिणा ठेवा. जोडीदाराचे मन राखण्याचा प्रयत्न कराल. दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे टाळा. आजचा दिवस उत्तम जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडू शकतात.
शुभरंग : तांबडा

कर्क (CANCER – Friday, May 26, 2023)
जुन्या आणि कटू आठवणीत रमू नका. कुटुंबातील व्यक्ती मानसन्मान देतील. आवडता पोषाख परिधान कराल. अघोरकष्टोद्धरण स्तोत्राचे नियमित पठण करा. मन शांत आणि स्थिर राहील. अनपेक्षितपणे एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. कुलदैवताची आराधना करा.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO -Friday, May 26, 2023)
श्रीरामाचे दर्शन घ्या. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. सुंदर वस्त्र आणि दागिने परिधान करण्याची संधी मिळेल. रामरक्षा म्हणा. आवडीनिवडी जपाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खरेदीकरिता वेळ काढाल..
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Friday, May 26, 2023)
भिडस्तपणा सोडावा लागेल. कनकधारा स्तोत्र वाचा. जुने भांडण-तंटे मिटवून टाका. दूरगामी विचार करून स्वत:चा फायदा करून घ्याल. आजचा दिवस अतिशय फायदेशीर आहे. चांगली बातमी मिळेल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. योगासने करण्यासाठी नियमित थोडासा वेळ द्या.
शुभरंग : हिरवा

तूळ (LIBRA – Friday, May 26, 2023)
गणेश पंचरत्न स्तोत्राची १/११/२१ अशी रोज आवर्तने करा. इतर लोकं तुमच्या मनासारखे वागत नसले तरीही त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. परिस्थितीत लवकर बदल होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस समाधानाने घालवाल. पैशाचा विनियोग काटकसरीने कराल.
शुभरंग : मोरपिसी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, May 26, 2023)
तत्परतेने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. टाळाटाळ केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाजोगी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडाल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. कामात स्वत:ला झोकून द्याल. आज इतर कोणत्याही चिंता तुम्हाला सतावणार नाहीत. श्रीगजाननाचे दर्शन घ्याल.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Friday, May 26, 2023)
कुटुंबियांसोबत कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी जाल. कौटुंबिक सौख्य मिळेल. आर्थिक बढती होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायातील अडचणी सुटतील. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. चांगले प्रवास घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यासाठी यथाशक्ती देणगी द्या.
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN -Friday, May 26, 2023)
मारुतीरायाचे दर्शन घ्या. शनिममहात्म्याचे वाचन करा. वायफळ खर्च करू नका. मित्रमैत्रिणींकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. आर्थिक खर्च काटकसरीने कारावा लागेल. घराबाहेर पडताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. घराच्या परसात आवडीचे फुलझाड लावून त्याची जोपासना करा. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS -Friday, May 26, 2023)
मनातल्या सकारात्मक कल्पना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न कराल. गणपतीची आराधना कराल. वेळ मिळाल्यास गणपतीचे दर्शन घ्या. आर्थिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनाचा भविष्यात लाभ होईल. तुमच्याकडे असलेली माहिती योग्य व्यक्तिलाच सांगा.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Friday, May 26, 2023)
घरातील थोरामोठ्यांकडून किंवा जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. भावंडाकडून सुख मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचा दिवस आहे. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. वाहत्या पाण्यात चुरमुरे सोडा. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. परिवर्तन हवे असल्यास ते आधी स्वत:च्या ह्रदयात करा.
शुभरंग : आकाशी