Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’30 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, May 30, 2023 )
न्यायालयातील प्रकरणात यश मिळेल. प्रत्येक काम करताना सावध राहा. बोलताना समजून उमजून बोला. कर्च घेताना सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून नुकसान होऊ शकते. मोती रंगाचा पोषाख परिधान करा. जलदान करा.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Tuesday, May 30, 2023)
आज दिवसभरातील कामाचे व्यवस्थित नियोजन करा. आळस सोडून कामाला लागाल. घरातील लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. करियरमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वेळेचा सदुपयोग कराल. गुलाबी रंग आज आपल्यासाठी लाभदायक आहे. घरात श्रीदुर्गादेवीची आरती कराल.
शुभरंग : लाल

मिथुन (GEMINI -Tuesday, May 30, 2023)
कुटुंबियांच्या सल्ल्याने निर्णय घ्याल. प्रॉपर्टीसंबंधित निर्णय योग्य विचार करून घ्याल. भाग्याची साथ मिळेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. आपल्या व्यवहारात मधुरता आणा. शिव मंदिरात जाऊन जल अभिषेक करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
शुभरंग : पिवळा

कर्क (CANCER – Tuesday, May 30, 2023)
उत्साहाने कामाला लागाल. मनातील चिंता दूर होतील. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. गायीला पोळी खाऊ घाला. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. आवडती व्यक्ती भेटेल. रखडलेली कामे मार्गी लावाल. सकाळी हिरव्यागार गवतावरून चालत जा. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चॉकलेटी

सिंह (LEO -Tuesday, May 30, 2023)
मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. पैसे काटकसरीने वापरा. लोकांच्या म्हणण्यानुसार तुमचे विचार बदलू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. शंकराची पूजा करा. कपाळावर चंदनाचा टिळा लावाल.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Tuesday, May 30, 2023)
आपल्या कामाला नशिबाची साथ मिळेल. धन लाभासाठी प्रयत्न कराल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण कराल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुख-शांती वाढेल. हिरव्या रंग आज आपल्यासाठी लाभदायक आहे. घरात ओम नम: शिवाय हा जप 108 वेळा करा. इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (LIBRA – Tuesday, May 30, 2023)
अनावश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च होऊ शकतात. दूरच्या नातेवाईकाकडून शुभ सूचना कानी येईल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, गरिबाला दुधाचे दान करा. मनाजोगी खरेदी कराल. दुर्गासप्तशतीचा पाठ करा. मन प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी कराल. कुमारिकांना खीर खाऊ घाला.
शुभरंग : नारिंगी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, May 30, 2023)
धन लाभाचा योग आहे. मेहनतील फळ चांगलेच मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. करियरमध्ये प्रगती कराल. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आवडता पोषाख परिधान कराल. कलेत आनंद मिळेल. लोकं तुमच्या म्हणण्याचा विचार करतील. मन प्रसन्न राहिल.
शुभरंग : चंदेरी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, May 30, 2023)
आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. समाजात मान-सन्मान वाढेल. बोलताना अहंकारी वृत्ती बाळगू नका. अडलेली कामे मार्गी लागतील. पिवळा रंग आपल्यासाठी लाभदायक आहे. गरिबाला अन्न खाऊ घाला. घराचे सुशोभिकरण कराल. लोकं तुमचे म्हणणे विचारात घेतील.
शुभरंग : राखाडी

मकर ( CAPRICORN -Tuesday, May 30, 2023)
नशिबाची साथ मिळेल. धनप्राप्तीचा योग आहे. आळसामुळे कामाची टाळाटाळ करू नका. सरकारी कामे मार्गी लावाल. जुन्या योजनांचा विचार करून नव्याने कामाला सुरुवात कराल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करावीशी वाटेल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
शुभरंग : पांढरा

कुंभ (AQUARIUS – Tuesday, May 30, 2023)
स्वत:ची योग्यता वाढवण्याचा विचार कराल. शिक्षणात प्रगती होईल. नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. निश्चित केलेल्या ध्येयाकडे लक्ष द्या. गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. मनातील गुपित योग्य व्यक्तिकडेच बोलून दाखवाल.
शुभरंग : जांभळा

मीन (PISCES – Tuesday, May 30, 2023)
कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्याल. सकारात्मक विचार कराल. धन लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. देवळात खडीसाखरेचा प्रसाद वाटा. गुलाबी रंगाचा पोषाख परिधान करा. वाणसामानाची खरेदी कराल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.
शुभरंग : आकाशी