शंभर युवक-युवतींना मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देणार -आमदार डॉ. राहुल पाटील

17

सामना प्रतिनिधी । परभणी

राज्य शासनाच्या वतीने लवकरच पोलीस दलात मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील सुमारे शंभर युवक-युवतींची निवड करुन त्यांना मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात बुधवार, १२ डिसंबर रोजी युवासेनेच्या वतीने संवाद अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर युवासेना सचिव वरुण सरदेसाई, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू, विस्तारक डॉ. गणेशराजे भोसले, राहुल लोंढे, उपसचिव योगेश निमसे, विपूल पिंगळे, नितीन लांडगे, परभणी-हिंगोली विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया, अ‍ॅड. अमीत गिते, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, विधानसभा संघटक अंबिका डहाळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले, गेल्या १० वर्षात सतत दोन वर्षांनी परभणी जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. ग्रामीण भागात राहणारा शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटाचा सातत्याने सामना करत आहे. अशा बिकट प्रसंगी त्यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे हे युवासेनेचे आद्य कर्तव्य आहे. या भावनेतुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवकांचे प्रश्न जाणून घेण्याच्या हेतुने संवाद अभियानाचे आयोजन केले असून दुष्काळग्रस्त भागातील हजारो युवक-युवतींना मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देण्यासाठी युवासेना कटीबद्ध आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना युवासेना सचिव वरुण देसाई यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. युवकांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी युवासेना सदैव त्यांच्या पाठीशी असून मुंबई येथे राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महागड्या शस्त्रक्रीया व आरोग्याच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी युवासेना अहोरात्र झटत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी युवासेना अधिकारी अर्जुन सामाले, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे, युवासेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे, दलित आघाडी तालुकाप्रमुख सुभाष जोंधळे, शहरप्रमुख अमोल गायकवाड, मकरंद कुलकर्णी, संदीप पांगरकर, तुषार चोभारकर, बंडूनाना बिडकर, बाळासाहेब डुकरे, शिवाजीराव चोपडे, गोपीनाथराव झाडे, गुणाजी अवकाळे, बाळासाहेब राखे, राहुल खटींग, मारोती तिथे, स्वप्नील भारती, फैजुल्ला पठाण, संजय साखरवाड, सुभाष माने, बाबु फुलपगार, तानाजी भोसले, लक्ष्मण भालेराव, सचिन सामाले, प्रभाकर जैस्वाल, राहुल खटीग, अ‍ॅड. अजित यादव, शरद हिवाळे आदींनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या