अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे!

367

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे असते; परंतु सोशल मीडियावर मांडलेल्या मताबाबत लोकांवर प्रभाव पडत असेल तर त्या मतांना विश्वासाचे बंधन असायला हवे, असे स्पष्ट करत हायकोर्टाने पॅराशूट तेलाबाबतच्या वादग्रस्त मजपूर हटविण्याबाबत विचार करा असे आदेश व्हिडीओ ब्लॉगरला दिले.

व्हिडीओ ब्लॉगर अभिजित भन्साली यांनी यू टय़ूबवर एक व्हिडीओ अपलोड करत पॅराशूट तेल विकत घेऊ नका असे सुचविले आहे. या वादग्रस्त मजपुराविरोधात मेरिको पंपनीने न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायमूर्तींनी संबंधित पोस्ट हटविण्याचे आदेश भन्साली यांना दिले होते. याविरोधात भन्साली यांनी हायकोर्टात अपील केले. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सोशल मीडियाचा वापर सावधगिरीने करायला हवा. सोशल मीडियावर व्यक्त केल्या जाणाऱया मतांमुळे प्रभाव निर्माण होत असतो, असे निरीक्षण नोंदवत याचिकेवरील सुनावणी 5 फेब्रुवारीपर्यंत तहपूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या