मैत्रीण

भाऊ कदम

तिचा भक्कम पाठिंबा

तुझी मैत्रीण ..  ममता (माझी पत्नी)

तिचा पॉझिटिव्ह पॉईण्ट .. खूप सपोर्टिव्ह आहे.

निगेटिव्ह पॉईण्ट..  तिच्या जे गरजेचं आहे, ते मी देण्याआधीच ती विकत घेते.

तिच्यातली आवडणारी गोष्ट .. तिचा मला आधार आहे म्हणूनच मी बाहेरचे कार्यक्रम करू शकतो. घर, मुलं सगळं तीच सांभाळते. एक आई म्हणून ती परिपूर्ण आहे.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट.. ती स्वतः, माझ्या तीन मुली आणि एक मुलगा हेच माझ्यासाठी आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट आहे.

तिच्याकडून काय शिकलात? नेहमी चांगलेच विचार करायचे. वाईट विचार नाही करायचे. दुसरा आपल्याशी वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायचं. सतत धरणीशी नातं ठेवायचं.

एकमेकांसाठी वेळ देता का ? हो. कधी कधी शूटिंगमुळे वेळ मिळत नाही; पण जेव्हा वेळ असेल तेव्हा वेळ देतो.

तिची आवडती डिश.. बाकरवडी.

ती डिस्टर्ब असते तेव्हा.. बोलतच नाही.    

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..  आम्हाला मुलगा झाला तो क्षण.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते?..  खूप बोलते. घडलेला एकच प्रसंग पुनः पुन्हा सांगते.

भांडण झाल्यावर काय करता?.. मी स्वतःहून बोलतो किंवा प्रसंगानुरूप गप्पही बसतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?.. मला येतो; पण तो तेवढय़ापुरताच असतो.

तिचे वर्णन.. पत्नीमध्ये जे गुण हवे असतात ते सर्व गुण तिच्यात आहेत. उगाच मोठेपणा, लावालाव्या करणे किंवा मोठेपणाचा उगाच आव आणणे असे दोष तिच्यात नाहीत. ‘आदर्श पत्नी’ म्हणून ती योग्य आहे.

तुझी एखादी तिला आवडणारी सवय.. हल्ली मी व्हॉट्सऍप, फोनवर खूप बोलते. माझ्या वाढलेल्या कामानिमित्त हे बोलणं गरजेचं आहे; पण याविषयी कधी कधी ती तक्रार करते.