मैत्रीण

शशांक केतकर…ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा

तुझी मैत्रीण… अनुजा साठे

तिच्यातली सकारात्मक गोष्ट.. ती खूप सुंदर असून तिच्यात खूप सकारात्मक ऊर्जा आहे.

तिच्यातली खटकणारी गोष्ट…पटकन चिडते, खूप हळवी, थोडी भित्रीही आहे.

तिच्यातली आवडणारी गोष्ट… सकारात्मक दृष्टिकोन, ती आसपास असली की, स्वतःबरोबर इतरांनाही आनंदी ठेवते.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे सुंदर भेट…विशेष काही नाही.

तिच्याकडून काय शिकलात ?… करियरचं नियोजन कसं करायचं.

एकमेकांसाठी वेळ देता का?…  हो

तिचा आवडता पदार्थ… सगळे मांसाहारी पदार्थ. ती फिटनेसबाबतही जागरुक आहे. त्यामुळे फिटनेससाठी लागणारे सलाड वगैर आहारही आवडीने घेते.

ती निराश असते तेव्हा.. ती मला फोन करून भेटण्याचा आग्रह करते. खूप बोलते करियर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण.. ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रिमियरला गेलो होतो. तेव्हा ती रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका, दिग्दर्शक यांच्याबरोबर  उभी होती तेव्हा मला तिचा खूप अभिमान वाटला. ‘क्रिकेट’ ही खूपच वेगळ्या धाटणीची सीरियल तिने केली तेव्हा मला असं वाटलं की, ठराविक सीरियलमध्ये न राहता तिने हिंदीत काम करून करियरची कक्षा रुंदावली.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते… तेव्हा ती मला यथेच्छ आणि हक्काने ओरडते.

भांडण झाल्यावर काय करता?… भेटतो. एकमेकांच्या चुका मान्य करतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? तिला

तिचे वर्णन.. तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे. तिचं वाचन खूप आहे, तितकंच तंत्रज्ञानाबाबतही अज्ञान आहे. तिला माहित असतं की, करियरमध्ये एखाद्या वळणावर कोणते निर्णय घ्यायचे.

तुझी एखादी तिला न आवडणारी सवय.. मी हिंदीमध्ये काम न करणं आणि तिला कमी वेळ देणं याचा तिला राग येतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या