मैत्री

दीप्ती देवी

तुझा मित्र…संदीप

त्याच्यातली सकारात्मक गोष्ट…प्रत्येक संकट आणि आव्हानांकडे कधीच नकारात्मक दृष्टीने पाहात नाही. त्याच्या हा दृष्टिकोन मला प्रेरणा देऊन जातो.

त्याच्यातली खटकणारी गोष्ट.. तो खूप संपर्कात नसतो. एकमेकांबरोबरचं भेटणं, बोलणं कामामुळे आता अगदीच बंद झालंय. फोनवर भेट होते.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…मार्गदर्शन.

त्याच्याकडून काय शिकलात? …प्रत्येक क्षणाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं. तसेच चांगलं कसं ऐकावं हे त्याने मला शिकवलं.

 त्याचा आवडता पदार्थ..पुरणपोळी.

तो निराश असते तेव्हा..अलिप्त राहतो.

एकमेकांसाठी वेळ देता का?..आता वाढत्या कामांमुळे कमी झालंय, पण आमची मैत्री अशी आहे की, किती वेळ घालवला त्यापेक्षा किती क्वॉलिटी टाईम वेळ एकमेकांना दिला हे महत्त्वाचं आहे.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण?…कॉफी शॉप.

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण.. कॉलेजमध्ये असताना आम्ही शॉपिंगला गेले होते. तेव्हा घेतलेला ड्रेस होत नाही म्हणून मी हलकासा फाडला होता आणि तो आवडला नाही म्हणून उलटा करून परत केला होता. त्यावेळी आम्ही खूप धमाल केली होती. तेव्हा तो मला म्हणाला होता ‘वन ऑफ द फनिएस्ट गर्ल’

तू चुकतेस तेव्हा तो काय करते?…फार चांगल्या शब्दात आणि उदाहरणं देऊन समजावून सांगतो.

भांडण झाल्यावर काय करता?..भांडण होतच नाही, कारण तुलना, पझेझिव्ह, जेलसी काहीच आमच्यात नाहीए. तरीही भांडण झालच तर आम्ही एकमेकांना सॉरी म्हणतो तेव्हा तो हसतो. फ्रेंडशिप हवीहवीशी वाटते म्हणून भांडणात फार वेळ नाही घालवत.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?..मला, कारण माझी मत मी स्पष्टपणे मांडत असते आणि तो ऐकत असतो.

तुझी एखादी त्याला न आवडणारी सवय ..मी खूप विचार करते. भावनिकदृष्टय़ा खूप अटॅच्ड असते.

 तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या..एकमेकांना सहाय्य करत घडत जाणं. हे दोघांच्याही बाबतीत व्हावं.

तुम्हाला तो कसा हसवतो?..जेव्हा मी दुःखी किंवा निराश असते तेव्हा मी काय काय प्रयत्न करतेय, माझ्या मनात काय कल्पना आहेत, हे तो मला सांगत असतो.

त्याचं वर्णन..तो परदेशात गेला तेव्हा त्याने एकटेपण अनुभवलं तरीही तिथली संस्कृती, राजकारण आणि इतरही बऱयाच गोष्टी त्याने शिकून घेतल्या. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी तुमच्याबरोबर सतत नसतील, तरीही स्वतःचा आनंद स्वतः शोधणं हे तुमच्या हातात आहे, असा प्रत्येक प्रसंगात तो शिकत असतो.

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली?..त्याच्याबरोबर जो कोणी मैत्री करतो तो पटकन व्यक्त होतो आणि शांत होतो. तेच माझ्याही बाबतीत झालंय. म्हणून मैत्री करावीशी वाटली नाही. मैत्री झाली.

आपली प्रतिक्रिया द्या