मैत्रीण: समंजस, परिपक्व

112

>>ओमप्रकाश शिंदे

जवळची मेत्रीण: शर्वरी लोहकरे.

तिचा पॉझिटिव्ह पॉईण्ट: ती सगळ्यांची खूप काळजी घेते.

निगेटिव्ह पॉईण्ट: कधी कधी जरा जास्तच काळजी घेते असं वाटतं.

तिच्यातली आवडणारी गोष्ट: ती स्वतः, कारण ती प्रत्येक वेळी कोणाला कशा प्रकारे मदत करता येईल, याचा विचार करते. तिचा हा गुण मला खूप आवडतो.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट: आता रिसेन्टली माझ्या वाढदिवसानिमित्त तिने मला प्रोटिनचा डबा गिफ्ट दिला.

तिच्याकडून काय शिकता आले: आधी मी फक्त स्वतःपुरता किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दलच विचार करत होतो. तिच्यामुळे मी इतरांचा विचार करायला लागलो. सगळ्यांना एका नजरेने पहायला शिकलो.

एकमेकांसाठी वेळ देता का?: हो. शर्वरीसह मयुरी देशमुख आणि अभिज्ञा भावे आम्ही सगळेच सेटवर भेटतो.

तिची आवडती डिश: मॅगी

ती डिस्टर्ब असते तेव्हा: शांत असते. कोणाशीही बोलत नाही.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण: काही नाही.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते: काय करायला हवे, काय नको ते समजावून सांगते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण: सेटवर. कधी कधी नवऱ्यासोबत तिच्या घरी.

भांडण झाल्यावर काय करता?: भांडण शक्यतो होतच नाही. झालं तरी फारसं काही टिकत नाही.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? शर्वरीला

तिचे वर्णन: खूपच प्रेमळ आहे. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचीच ती खूप काळजी घेते.

तुझी एखादी तिला न आवडणारी सवय: मी कधी कधी खूप प्रॅक्टिकल बोलतो, ते तिला आवडत नाही.

sharvari-lohokare

आपली प्रतिक्रिया द्या