थंडीमुळे इंधनाच्या दरात वाढ! पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जावईशोध

थंडीमुळे इंधनाच्या दरात सध्या वाढ झाली आहे. हिवाळा कमी झाला की पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किमतीही खाली येतील, असा नवा जावईशोध केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी लावला आहे.

दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांचे शुक्रवारी सकाळी लालबहादूर शास्त्र्ााr आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी पत्रकारांनी इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हिवाळ्यामुळे पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढल्या आहेत, असे सांगत इंधन दरवाढीचे समर्थन केले.

थंडीमुळे इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. हवामान बदलल्यास किंमत कमी होईल. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं. हिवाळा कमी होईल, तशा या किंमतदेखील कमी होतील, असं ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या