विजय मल्ल्या कुठल्य़ाही क्षणी हिंदुस्थानात येऊ शकतो, मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी

1517

हिंदुस्थानी बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या कुठल्याही क्षणी हिंदुस्थानात येऊ शकतो. मुंबईत मल्याच्या विरोधात याचिका दाखल आहे. त्यामुळे त्याला मुंबईत आणून आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याची शक्यता आहे.

मिंट या वृत्तपत्राने IANS या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. 14 मे रोजी ब्रिटनच्या न्यायालयाने माल्याच्या हिंदुस्थान प्रत्यार्पणाचा आपला निकाल दिला होता. ब्रिटनच्या नियमानुसार निकालापासून ते 28 दिवसांत मल्ल्यचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण होणे गरजे आहे. या निर्णयाला 20 दिवस झाले असून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

 

 

प्रवर्तन निर्देशालय (ED) च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्ल्याला कुठल्यही क्षणी हिंदुस्थानात आणू शकतात. मल्ल्याची याचिका ब्रिटन न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.

किंगफिशरचा एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील 17 बँकांतील 9 हजार कोटींचे कर्ज आहे. मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी हिंदुस्थान सोडून ब्रिटनला पळाला होता. हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढाई ल्ढली. तेव्हा ब्रिटनच्या न्यायालयाने ही मागणी मान्य करत 14 मे रोजी हा निकाल दिला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या