आश्वासनांची पूर्तता; पाट काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्याचे भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील पाट येथील काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी 51 लाखाचा निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणला आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी आपल्या जनसंवाद अभियानात एक महिन्यापूर्वी दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.

अवघ्या महिन्याभरात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आमदार वैभव नाईक यांनी केल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक करत माजी सभापती चंद्रकांत माधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी गेल्या महिन्यामध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या समस्या-अडचणी सोडविण्यासाठी जनसंवाद अभियान राबविले होते.  या अभियानामध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षात राबवलेल्या विकास कामांचा आढावा घेतला होता. भविष्यात कोणती विकास कामे करण्यात येणार आहेत, याबाबतही माहिती दिली. या जनसंवाद अभियानावेळी पाट काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्यासाठी मागणी पाट येथील ग्रामस्थांनी केली  होती. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी येत्या महिन्याभरात ग्रामस्थांची  मागणी पूर्ण करणार असल्याचे वचन दिले होते. आ. वैभव नाईक यांनी ही वचनपूर्ती केली असून  पाट काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्याचा भूमिपूजन  सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी सभापती राजन जाधव, माजी सभापती चंद्रकांत माधव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, पं. स.सदस्य डॉ. सुबोध माधव, सरपंच सौ. रीती राऊळ, उपसरपंच गिरीप्रसाद राऊळ, उपविभागप्रमुख महेश वेळकर, बाळू पालव, संदेश प्रभू, शर्मीला परब, उमेश प्रभू, संतोष पुरोहित, संतोष जोशी, सखाराम नाईक, श्रीनिवास करंदीकर, मंदार पाटकर, बापू नांदोसकर, ग्रामपंचायत माजी सदस्य बबन राणे श्याम परब, नितीन राऊळ आदींसह शिवसैनिक, ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आपली प्रतिक्रिया द्या