कोकणातील गणपतीच्या जादा फेऱ्यांचे आरक्षण सुरू होताच फुल्ल!

30
konkan-railway

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेने चाकरमान्यांची कोकण मार्गावर गौरी-गणपतीच्या सणासाठी होणारी गर्दी पाहून यंदा १३२ जादा फेऱ्या सोडल्या आहेत. मात्र तिकिटांचे आरक्षण सुरू होताच नेहमीप्रमाणेच या गाडय़ा फुल होऊन चाकरमान्यांच्या हाती ‘वेटिंग’चे तिकीट पडले आहे. विशेष म्हणजे  २२ ते २३ डब्यांच्या ऐवजी यंदा बहुतांश गाडय़ा केवळ १८ डब्यांच्या सोडल्या आहेत. खरे तर १२० दिवस आधी तिकिटे आरक्षित करणाऱ्या चाकरमान्यांची प्रतीक्षा यादी संपविण्यासाठी अनारक्षित गाडय़ा सोडण्याची गरज असताना पुन्हा भल्यामोठय़ा प्रतीक्षा यादीचा बोजा चाकरमान्यांच्या माथी मारला आहे.

सणासुदीच्या दिवसांत रेल्वे गाडय़ांना तुफान गर्दी होत असते. एसटी, लक्झरी, खासगी गाडय़ांचे पर्याय असले तरीही लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ांची मागणी वाढते आहे. आता मध्य रेल्वेने सोडलेल्या १३२ जादा गाडय़ांचे आरक्षण ३० जून रोजी सकाळी सुरू होताच हाती तीनशे ते पाचशेची प्रतीक्षा यादी पडली आहे. त्यामुळे हजारो चाकरमान्यांचे लक्ष नवीन घोषित होणाऱ्या फेऱ्यांकडे लागले आहे.

यंदा बऱ्याच गाडय़ा १८ डब्यांच्या आहेत. त्यामुळे आता परत नवीन प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे, परंतु आधीच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांची रेल्वेने व्यवस्था करायला हवी. कारण त्यांनी १२० दिवस आधी तिकिटे आरक्षित केली आहेत-बळीराम राणे, प्रवासी

गाडी                             दिनांक         प्रतीक्षा यादी

  • एलटीटी-सावंतवाडी          ११ सप्टेंबर          ४८८
  • सीएसएमटी-सावंतवाडी      १३ सप्टें.            १४१ (साप्ताहिक)
  • पनवेल-सावंतवाडी           ११ सप्टेंबर          १६०
  • पनवेल-सावंतवाडी           १२ सप्टेंबर          ११९
  • पनवेल-सावंतवाडी           ११ सप्टें.            ४१  (डबलडेकर साप्ताहिक )
  • पनवेल-सावंतवाडी           ११ सप्टेंबर        ३०४
  • पनवेल-सावंतवाडी           १२ सप्टेंबर         ११९
आपली प्रतिक्रिया द्या