विदर्भसिंह जांबुवंतराव धोटे पंचत्वात विलीन

सामना ऑनलाईन, मुंबई – हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर आज यवतमाळ जिह्यात त्यांच्या जन्मगावी पिंपरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते. ‘भाऊ जांबुवंतराव धोटे अमर रहे’ या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काल पहाटे त्यांचे निधन झाले होते. तत्पूर्वी यवतमाळ शहरातील नेताजी चौक आणि नेताजी मार्केट या दोन ठिकाणी ही अंत्ययात्रा नेण्यात आली. नेताजी मार्केटमधून त्यांची अंत्ययात्रा निघाल्यावर ती थेट पिंपरीकडे रवाना झाली. या अंत्ययात्रेत विविध पक्षांचे राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि जनसामान्य प्रचंड मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या