चुंबन दृश्यावरील प्रश्नावरून शाहीद भडकला, पत्रकाराला फटकारले

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता शाहीद कपूर याच्या कबीर सिंग या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याचा व अभिनेत्री किआरा आडवाणीचा किसिंग सिन दाखविण्यात आला आहे. या सिनवरून सतत प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकारावर शाहीद कपूर भडकला असून त्याने त्याला चांगलेच फटकारले.

ट्रेलर लाँचच्या वेळी एका पत्रकाराने किआराला या चित्रपटात किती किसिंग सिन आहे असा प्रश्न केला. त्यावर किआराने मी ते मोजले नाहीत असे उत्तर दिले. त्या उत्तराने समाधान न झालेल्या त्या पत्रकाराने पुन्हा एकदा किआराला तोच प्रश्न केला. त्यावरून शाहीदचा पारा चढला व त्याने त्या पत्रकाराला चांगलेच सुनावले. ‘बऱ्याच काळापासून तुझी कोणी गर्लफ्रेंड नाहीए का? अरे पप्पी सोडून देखील काही प्रश्न विचार. आम्ही अभिनय पण केला आहे या चित्रपटात’ असे शाहीदने त्या पत्रकाराला सुनावले.

शाहीद कपूर याचा कबीर सिंग हा चित्रपट येत्या 21 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहीद एका व्यसनी आशिकच्या भूमिकेत दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या