फ्युजन-टेक्नोकल्चरल मिलाप

46

संस्कृती जपणे आज काळाची गरज आहे. याच संकल्पनेच्या आधारे सायन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजीनियरींग कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्युजन या वार्षिक कल्चरस फेस्टसोबत तंत्रा आणि ऑसिलेशन या दोन तांत्रिक फेस्टचा मिलाप घडवण्यात आला आहे. हा फेस्ट १२ ते १६ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. दै. ‘सामना’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. ऑसिलेशन या तांत्रिक फेस्टने या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून यात लॅन गेमिंग, लेझर रुम, पेपर प्रेझेंटेशन असे बरेच मनोरंजक खेळ ठेवण्यात आले आहेत. या इव्हेंटमध्ये थ्रीडी एक्रोबॅटीक’ हा एअर शोही होणार आहे. यातून मुलांच्या तांत्रिक व सांस्कृतिक कलागुणांना नक्कीच वाव मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या