अकरावी कोटा प्रवेश 8 जूनपासून नोंदणी

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येत्या 8 जूनपासून व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटय़ातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच पेंद्रीय प्रवेशासाठी प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत प्रवेशासाठी 8 ते 12 जून या कालावधीत नोंदणी करावी लागेल. शून्य फेरीअंतर्गत 13 जून रोजी कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत प्रवेशासाठी विद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. विद्यालयांना 13 ते 15 या कालावधीत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. तसेच 16 ते 18 जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील.