कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आयकर खात्याच्या जाळ्यात

341

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता जी. परमेश्वर यांच्यासह काँग्रेसच्या आणखी काहीजणांच्या 30 ठिकाणांवर आयकर विभागाने गुरुवारी अचानक छापे घातले. यात विभागाला बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली असून त्यात त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका ट्रस्टद्वारे संचालित मेडिकल कॉलेजमधून एनईईटी परीक्षांशी संबंधित चाललेल्या अनागोंदी कारभाराचीही माहिती आढळली आहे. कर्नाटक आणि राजस्थानातील त्यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या 80 अधिकाऱयांनी एकाच वेळी छापे मारले आहेत. आयकर खात्याच्या छाप्यांबद्दल परमेश्वर यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा ते म्हणतात, या छाप्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. ते कुठे छापे मारत आहेत याची मला कल्पना नाही, पण मला काहीच फरक पडत नाही. माझ्याकडून जर काही चूक घडलेली असेल तर आम्ही त्याचे स्पष्टीकरण देऊ,असे ते म्हणाले. परमेश्वर यांच्या ‘श्री सिद्धार्थ एज्युकेशन ट्रस्ट’द्वारे टुमकुर शहरात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या