राज्यात परतण्याची इच्छा नाही- नितीन गडकरी

1216

राज्यात मतदारांच्या बोटावरची शाई पुसून जात आहे परंतु अजून सत्ता स्थापनेचा तिढ सुटत नाहिये. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. तेव्हा राज्यात परतण्याची आपली इच्छा नाही अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले की, “राज्यात सत्तास्थापनेचा आणि संघाचा संबंध नाही. महाराष्ट्रात भाजपला  जागा मिळालेल्या आहेत. युतीत ज्यांचे संख्याबळ जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल. राज्यात लवकरच सत्तास्थापन होईल त्यासाठी शिवसेना नक्कीच सहकार्य होईल.” मी केंद्रात आहे आणि राज्यात परतण्याची माझी इच्छा नाही असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या